सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • बाळासाहेबांचे दोन्ही बछडे एकत्र आले, शिवसेना-मनसे युतीची घोषणा, राज-उद्धव ठाकरेंनी निवडणुकीचं रणशिंग फुंकलं
  • इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
  • ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार, ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
  • धाराशिवमध्ये ठाकरे गटाचा पराभव; राणा जगजितसिंहांनी ओमराजे निंबाळकरांच्या जखमेवर मीठ चोळलं, म्हणाले, 'बाळा नाद करायचा नाही'
 व्यक्ती विशेष

बाळासाहेबांचे दोन्ही बछडे एकत्र;शिवसेना (ठाकरे गट) – मनसे युतीची अधिकृत घोषणा;, राज–उद्धव ठाकरेंनी फुंकलं निवडणुकीचं रणशिंग

डिजिटल पुणे    24-12-2025 13:18:00

मुंबई : राज्यातील राजकारणात मोठा भूकंप घडवणारी घडामोड बुधवारी समोर आली. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती अखेर जाहीर झाली. वरळी येथील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मनसे–ठाकरे गटाच्या युतीची अधिकृत घोषणा केली.युतीच्या घोषणेनुसार, मुंबईसह राज्यातील सात महानगरपालिकांच्या निवडणुका दोन्ही पक्ष एकत्र लढवणार आहेत. पत्रकार परिषद होण्यापूर्वी राज आणि उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावरील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे उपस्थित होते.

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) युती अखेर बुधवारी अधिकृतपणे जाहीर झाली. वरळी येथील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा केली. ही युती मुंबईसह राज्यातील सात महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये एकत्र लढणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं.पत्रकार परिषदेपूर्वी राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासह संपूर्ण ठाकरे कुटुंबाने शिवतीर्थावरील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं. यावेळी रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे उपस्थित होते.युती जाहीर करताना राज ठाकरे म्हणाले, “शिवसेना–मनसे युती झाली आहे, हे मी अधिकृतपणे जाहीर करतो. महाराष्ट्र कोणत्याही वादापेक्षा मोठा आहे.

राज ठाकरे काय म्हणाले?

पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे म्हणाले,“शिवसेना–मनसेची युती झाली आहे, हे मी अधिकृतपणे जाहीर करतो. महाराष्ट्र कुठल्याही वादापेक्षा मोठा आहे, या भूमिकेतूनच एकत्र येण्याची सुरुवात झाली. जागावाटपाबाबतची माहिती योग्य वेळी दिली जाईल. सध्या राजकीय पक्षातील ‘मुलं पळवणाऱ्या टोळ्या’ सक्रिय आहेत. त्यामुळे उमेदवारी आणि अर्ज भरण्याबाबतची सूचना योग्य वेळी केली जाईल.” जागावाटपाबाबत सध्या काही सांगणार नाही. योग्य वेळी उमेदवार अर्ज कधी भरायचे, याची माहिती दिली जाईल.” त्यांनी राजकीय पक्षांवर उपरोधिक टोला लगावत “मुलं पळवणाऱ्या टोळ्या” अशी टीकाही केली.

उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांनी यावेळी आक्रमक भूमिका घेत भाजपवर जोरदार टीका केली.“भाजपला मुंबईचे लचके तोडायचे आहेत. आम्ही जर अजून भांडत राहिलो, तर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांचा अपमान होईल. आम्ही कर्तव्य म्हणून एकत्र आलो आहोत आणि एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलो आहोत.”पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले,“मुंबई आणि महाराष्ट्राकडे जो कोणी वाकड्या नजरेने पाहील, त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. भाजपने ‘कटेंगे तो बटेंगे’चा अपप्रचार केला. आता मराठी माणसाने चूक केली, तर तो संपेल. त्यामुळे मराठीचा वसा टाकू नका, असे मी आवाहन करतो.”

युतीमुळे राजकीय समीकरणे बदलणार

शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे युतीमुळे मुंबई महापालिकेसह महापालिका निवडणुकांमध्ये राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. मराठी मतांच्या एकत्रीकरणाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.शिवसेना–मनसे युतीच्या घोषणेमुळे मुंबईसह राज्याच्या राजकारणात मोठी हालचाल निर्माण झाली असून, आगामी महापालिका निवडणुकांमध्ये ही युती निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती