पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत रविवार, दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता 'धारा' हे कथक नृत्य सादरीकरण आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह(सेनापती बापट रस्ता), शिवाजीनगर येथे होणार आहे.
'अनाहत आर्ट फाउंडेशन' प्रस्तुत या कार्यक्रमात कथक नृत्यांगना आणि आरोहिणी कथक स्कूलच्या संचालिका प्राजक्ता राज यांचे एकल सादरीकरण तसेच 'नृत्याधाम ट्रूप'चे समूह नृत्य सादर होणार आहे. धारा या संकल्पनेतून कथक नृत्याच्या परंपरागत प्रवाहांचे सजीव दर्शन घडविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाची संकल्पना( क्युरेशन) हे नृत्यांगना प्रेरणा देशपांडे यांचे आहे.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित हा २७१ वा कार्यक्रम आहे.कार्यक्रम सर्व रसिकांसाठी खुला असून सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी केले आहे.