सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका
  • बाळासाहेबांचे दोन्ही बछडे एकत्र आले, शिवसेना-मनसे युतीची घोषणा, राज-उद्धव ठाकरेंनी निवडणुकीचं रणशिंग फुंकलं
  • इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
  • ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार, ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
  • धाराशिवमध्ये ठाकरे गटाचा पराभव; राणा जगजितसिंहांनी ओमराजे निंबाळकरांच्या जखमेवर मीठ चोळलं, म्हणाले, 'बाळा नाद करायचा नाही'
 जिल्हा

हुतात्म्यांच्या धुतूम ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी कॉंग्रेसच्या स्मिता ठाकूर बिनविरोध!

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी )    24-12-2025 16:43:28

उरण : देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या धुतूम गाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बुधवारी (ता. २४) स्मिता नंदकुमार ठाकूर यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी महेंद्रशेठ म्हणाले, "निवडणूक लढताना दिलेली आश्वासने पूर्ण करा. पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटला आहे, पण तो शंभर टक्के सुटला पाहिजे. मैदान आणि समाज मंदिर हे प्रश्न लवकरच सुटतील. महिला लढावू आहेत, त्यांना संधी मिळालीच पाहिजे. धुतूम ग्रामपंचायत आणि सर्वच पदाधिकारी चांगले काम करतायत. त्या सर्वांचे अभिनंदन!"  यावेळी सरपंच सुचिता प्रेमनाथ ठाकूर,  आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत आणि कार्यकर्ते यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी महेंद्रशेठ घरत आणि ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी हुतात्म्यांना अभिवादन केले.
 धुतूमचे माजी सरपंच शंकर ठाकूर, उद्योजक पी. जी. शेठ ठाकूर, कॉंग्रेसचे उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, डॉ. मनीष पाटील, मिलिंद पाडगावकर, अखलाख शिलोत्री आणि कॉंग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच धुतूमचे नारायण पाटील, राजन कडू, मनोज ठाकूर, राजेश ठाकूर, सुजित ठाकूर, नरेश ठाकूर, दिगंबर ठाकूर, तेजस पाटील, रामचंद्र पाटील, श्याम ठाकूर, प्रल्हाद ठाकूर, प्रसाद ठाकूर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती