खोपोली : खोपोली मधील मंगेश काळोखे हत्या प्रकरणासंदर्भात नवी अपडेट समोर आली आहे. खोपोली येथील मंगेश काळोखे हत्या प्रकरणात रायगड पोलिसांना मोठे यश मिळाले असून या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या रवींद्र देवकर आणि त्यांचा मुलगा दर्शन रवींद्र देवकर यांना अटक करण्यात आली आहे. हत्येनंतर अवघ्या 26 तासांत आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. या हत्येच्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलंआहे. मंगेश काळोखे हत्या प्रकरणातील मुख्य 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. रवींद्र देवकर आणि त्यांचा त्यांचा मुलगा दर्शन रवींद्र देवकर याला रायगड पोलिसांनी अटक करत ताब्यात घेतलं आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली 8 वेगवेगळ्या टीम तपासाठी कार्यरत होत्या. या तपासात खोपोली, नवी मुंबई, मुंबई एअरपोर्ट, रायगडसह अन्य परिसरात 8 टीम काल पासून कार्यरत असून आरोपींचा शोध घेत होते.
अशातच, रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथे आज सकाळी रवींद्र देवकर, दर्शन देवकर यांच्या गाडीला पोलिसांनी गाडी आडवी टाकून पकडल्याची माहिती आहे. तर हत्येची घटना घडल्यानंतर 26 तासात मुख्य आरोपी असलेले रवींद्र देवकर यांना अटक करण्यात रायगड पोलिसांना मोठं यश आलं आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास करण्यासाठी 8 स्वतंत्र पथके तैनात करण्यात आली होती. खोपोली, नवी मुंबई, मुंबई विमानतळ, नागोठणे व रायगड जिल्ह्यातील विविध भागात आरोपींचा शोध सुरू होता. अखेर नागोठणे परिसरात आज सकाळी पोलिसांनी आरोपींच्या वाहनाला आडवा घालून त्यांना ताब्यात घेतले.
राजकीय वैरातून हत्या झाल्याचा संशय
मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश काळोखे यांच्या पत्नी मानसी काळोखे यांनी नुकत्याच झालेल्या खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीत देवकर कुटुंबातील महिला उमेदवाराचा पराभव केला होता. त्या शिंदे गटाच्या शिवसेनेतून नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. याच राजकीय वैरातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन
हत्या प्रकरणात आरोपींना तत्काळ अटक न झाल्याने काल खोपोलीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली समर्थकांनी खोपोली पोलीस ठाण्याला घेराव घालून ठिय्या आंदोलन केले होते. आरोपींना अटक न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला होता.
मात्र आता मुख्य आरोपींना अटक झाल्याने हे आंदोलन मागे घेतले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नेमकं काय घडलं?
शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास खोपोली नगरपालिकेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची अज्ञात हल्लेखोरांनी निर्घृण हत्या केली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर काळ्या रंगाच्या वाहनातून घटनास्थळी आले होते आणि हल्ल्यानंतर फरार झाले.
या प्रकरणी पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांचाही त्यात समावेश आहे. हत्या नेमकी कुणाच्या आदेशावर आणि कोणत्या कारणामुळे करण्यात आली, याचा तपास अद्याप सुरू आहे.