पुणे : पुण्यातील महापालिका निवडणुकीत वादग्रस्त आणि खळबळजनक घडामोड समोर आली आहे. आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी आणि आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याने तुरुंगातून बाहेर येत थेट निवडणुकीच्या मैदानात एन्ट्री केली आहे. तोंडावर काळं कापड, हातात साखळी आणि व्हिक्ट्री साईन दाखवत बंडू आंदेकरने भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
पोलीस बंदोबस्तात आणलेल्या बंडू आंदेकरने यावेळी घोषणाबाजी करत,“नेकी का काम, आंदेकर का नाम”,“मी उमेदवार आहे, दरोडेखोर नाही”,अशा घोषणा दिल्या. त्याच्या या एन्ट्रीमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं.बंडू आंदेकर सध्या आयुष कोमकर हत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहे. विशेष न्यायालयाने त्याला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सशर्त परवानगी दिली होती. मात्र, अर्ज भरताना मिरवणूक, भाषण किंवा घोषणाबाजी करण्यास न्यायालयाने स्पष्ट मनाई केली होती. तरीही अर्ज दाखल करताना घोषणाबाजी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं.
आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरने पोलीस बंदोबस्तात त्याचा उमेदवारी अर्ज दाखल केला. पुण्यातील भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात त्याने अर्ज दाखल केला. आयुष कोमकर हत्या प्रकरणात बंडू आंदेकर सध्या तुरुंगात आहे. बंडू आंदेकरने पुण्यातील प्रभाग क्रमांक 24 मधून अपक्ष अर्ज भरल्याची माहिती आहे.
बंडू आंदेकरला पोलिसांनी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात आणलं. त्यावेळी बंडू आंदेकरने घोषणाबाजी केली. 'नेकी का काम, आंदेकर का नाम' अशी घोषणा आंदेकरने दिली. 'बघा बघा, मला लोकशाहीत कसं आणलंय. आंदेकरांना मत म्हणजे विकास कामाला मत. मी उमेदवार आहे, दरोडेखोर नाही. वनराज आंदेकर जिंदाबाद..' असं बंडू आंदेकर म्हणाला.
आंदेकर कुटुंबात तिघांनी अर्ज भरला
बंडू आंदेकर आणि त्यांच्या कुटुंबातील लक्ष्मी उदयकांत आंदेकर तसेच सोनाली वनराज आंदेकर यांना आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास विशेष न्यायालयाने सशर्त परवानगी दिली होती. मात्र बंडू आंदेकरला उमेदवारी अर्ज दाखल करताना मिरवणूक, भाषण, घोषणाबाजी करायला कोर्टाने मनाई केली.
सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर हेदेखील 5 कोटी 40 लाखांच्या खंडणी प्रकरणात जेलमध्ये आहेत. आता यांना प्रचार करताना मात्र नियम पाळावे लागणार आहेत.आंदेकर कुटुंबातील बंडू आंदेकर याच्यासह लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सोनाली वनराज आंदेकर यांनीही आगामी महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले आहेत. या दोघींनाही 5 कोटी 40 लाखांच्या खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली असून त्या सध्या तुरुंगात आहेत.विशेष न्यायालयाने तिघांनाही अर्ज दाखल करण्याची परवानगी दिली असली तरी प्रचार करताना कायदेशीर नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत.
राष्ट्रवादीकडून उमेदवारीचे संकेत?
दरम्यान, आंदेकर कुटुंबातील सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांचा आयुष कोमकर हत्याकांडाशी थेट संबंध नसल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी केला आहे. त्यामुळे या दोघींना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याचे संकेत दिले जात आहेत.मात्र, बंडू आंदेकरला राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळणार का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. प्रभाग क्रमांक 22, 23 आणि 24 मधून आंदेकर कुटुंबातील तिघेही निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती आहे.पुण्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आरोपी थेट निवडणुकीच्या मैदानात उतरत असल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र चर्चा सुरू झाली आहे.