धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील कडकनाथ वाडी येथे पवनचक्कीसाठी साहित्य वाहून नेणाऱ्या भरदार वाहनाने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मृतांमध्ये चांद शेख आणि वसंत जगताप यांचा समावेश आहे.या घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी संबंधित वाहनाला आग लावली. या परिसरातून अवजड वाहनांची वाहतूक करण्यास नागरिकांनी यापूर्वी विरोध केला होता, तरीही वाहतूक सुरूच राहिल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.
धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा परिसरात पवनचक्कीच्या वाहनाने दुचाकीला चिरडल्याची धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात दुचाकीवरून प्रवास करणारे वसंत जगताप आणि चांद शेख (दोघेही रा. कडकनाथवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.
पवनचक्कीसाठी वाळू सिमेंट खड्याच मिश्रण वाहून घेणाऱ्या भरदार वाहनाने धडक दिल्याने यांचा मृत्यू झाला. या भागातून अवजड वाहनांची वाहतूक करण्यास नागरिकांनी यापूर्वी विरोध केला होता त्यानंतर ही वाहतूक सुरू होती. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी वाहन पेटवून दिली.
समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, तेरखेडा-कडकनाथवाडी रस्त्यावरून दुचाकीवरून जात असताना पवनचक्कीचे साहित्य वाहून नेणाऱ्या अवजड वाहनाने जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती ही दुचाकी पूर्णपणे चिरडली गेली आणि दोन्ही तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना कडकनाथवाडी येथील जागरूक ग्रामस्थांनी पाठलाग करून सदरील वाहन अडवले. यानंतर ग्रामस्थांनी वाहनचालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले.
विशेष म्हणजे मागील महिन्यातही याच परिसरात पवनचक्कीच्या वाहनाने एका शेतकऱ्यास चिरडल्याची घटना घडली होती. त्या घटनेनंतरही पवनचक्कीच्या वाहनांच्या बेशिस्त वाहतुकीबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने पुन्हा एकदा निष्पाप जीवांचा बळी गेला असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. अवजड वाहनांची वेगमर्यादा, रात्रीची वाहतूक आणि सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा रोष नागरिक व्यक्त करत आहेत.