सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • नाशिकमध्ये प्रचंड गोंधळ, भाजपकडून पोलीस बंदोबस्तात AB फॉर्मचं वाटप; तिकिटाचा काळाबाजार होत असल्याचा इच्छुक उमेदवारांचा आरोप
  • पुण्यात भाजप अन् शिवसेनेची युती तुटली नाही; एबी फॉर्म दिलेत पण....; उदय सामंतांनी युतीचं चित्र केलं स्पष्ट
 विश्लेषण

मोठी बातमी : अजित पवारांनी टोक गाठलं; कुख्यात आंदेकर कुटुंबातील दोघींना राष्ट्रवादीचं तिकीट, तुरुंगातूनच निवडणूक लढवणार

डिजिटल पुणे    30-12-2025 17:12:49

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीत अजित पवार आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढत आहेत. अजित पवारांनी उमेदवारांसाठी निवडून येणे हाच एकमेव निकष ठेवला आहे.अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाकडून आयुष कोमकर हत्याप्रकरणात  तुरुंगात असलेल्या सोनाली आणि  लक्ष्मी आंदेकर यांना महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.  प्रभाग क्रमांक 23 मधून सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवणार आहेत. या दोघीही तुरुंगातुन निवडणूक लढवणार आहेत. आयुष कोमकर हत्या प्रकरणात दोघी तुरुंगात आहेत. तत्पूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आज गुंड गजा मारणेची बायको जयश्री मारणेला हिलादेखील पुण्यातून  उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर आता गुन्हेगारीचा तगडा इतिहास असलेल्या आंदेकर कुटुंबातील दोघांना अजित पवारांनी उमेदवारी दिली आहे. 

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने वादग्रस्त निर्णयांची मालिका सुरूच ठेवली आहे. याआधी कुख्यात गुंड गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे यांना उमेदवारी दिल्यानंतर आता गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आंदेकर कुटुंबातील लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना थेट तिकीट देण्यात आले आहे. विशेष म्हणजे या दोघी सध्या तुरुंगात असून, तुरुंगातूनच निवडणूक लढवणार आहेत.

प्रभाग क्रमांक 23 मधून उमेदवारी

पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 23 मधून लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. आयुष कोमकर हत्या प्रकरणासह 5 कोटी 40 लाखांच्या खंडणी प्रकरणात त्या सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

‘निवडून येणे हाच निकष’

अजित पवार यांनी उमेदवार निवडताना “निवडून येण्याची क्षमता हाच एकमेव निकष” असल्याचे स्पष्ट केल्याचे सांगितले जाते. मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना सातत्याने उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादीवर जोरदार टीका होत आहे.“पुणे गुन्हेगारीमुक्त करणार” असा दावा करणाऱ्या अजित पवारांच्या वक्तव्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

न्यायालयाकडून सशर्त परवानगी

बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर, लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विशेष न्यायालयाने सशर्त परवानगी दिली होती. त्यानुसार 27 डिसेंबर रोजी लक्ष्मी आणि सोनाली आंदेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.मात्र बंडू आंदेकर यांना अर्ज दाखल करताना मिरवणूक, भाषण किंवा घोषणाबाजी करण्यास न्यायालयाने मनाई केली आहे. प्रचार करतानाही या दोघींना कठोर नियमांचे पालन करावे लागणार आहे.

नेमकं प्रकरण काय?

मामाजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा नातेवाईक असलेल्या गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याची गोळीबार करून हत्या करण्यात आली होती. या हत्येमुळे आंदेकर टोळीतील वाद अधिक चिघळला. या प्रकरणात बंडू उर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर (70, रा. नाना पेठ) याच्यासह 13 जणांविरोधात खून आणि मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खटल्यातील आरोपी आणि बंडू आंदेकर याचा मुलगा कृष्णा उर्फ कृष्णराज आंदेकर (36) हा आयुषच्या खुनानंतर फरार झाला होता. काही दिवसांपूर्वी बंडू आंदेकर याने सार्वजनिकरित्या "कृष्णाचा शोध द्या, नाहीतर त्याचा एन्काउंटर होईल," असा दावा केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कृष्णा आंदेकर स्वतःहून समर्थ पोलिस ठाण्यात हजर झाला. या घटनेनंतर आंदेकर टोळीतील अंतर्गत वाद अधिक चिघळले.या प्रकरणात बंडू उर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर (वय 70, रा. नाना पेठ) याच्यासह 13 जणांविरोधात खून आणि मकोका अंतर्गत गुन्हे दाखल आहेत.

कृष्णा आंदेकर प्रकरण

आयुष कोमकर हत्येनंतर बंडू आंदेकर याचा मुलगा कृष्णा उर्फ कृष्णराज आंदेकर फरार झाला होता. काही दिवसांपूर्वी बंडू आंदेकर याने “कृष्णाचा शोध द्या, नाहीतर त्याचा एन्काउंटर होईल,” असा दावा सार्वजनिकरित्या केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कृष्णा आंदेकर स्वतःहून समर्थ पोलिस ठाण्यात हजर झाला.

राजकीय वर्तुळात खळबळ

गजा मारणे आणि आंदेकर कुटुंबाला दिलेल्या उमेदवारीमुळे पुण्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, आगामी निवडणूक प्रचारात हा मुद्दा केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे.


 Give Feedback



 जाहिराती