सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
  • मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
  • नाशिकमध्ये प्रचंड गोंधळ, भाजपकडून पोलीस बंदोबस्तात AB फॉर्मचं वाटप; तिकिटाचा काळाबाजार होत असल्याचा इच्छुक उमेदवारांचा आरोप
  • पुण्यात भाजप अन् शिवसेनेची युती तुटली नाही; एबी फॉर्म दिलेत पण....; उदय सामंतांनी युतीचं चित्र केलं स्पष्ट
 विश्लेषण

थर्टीफर्स्ट सेलिब्रेशनसाठी पुण्यात मोठे वाहतूक बदल; महात्मा गांधी, फर्ग्युसन, जंगली महाराज रस्ता बंद, पर्यायी मार्ग जाहीर

डिजिटल पुणे    31-12-2025 10:58:24

पुणे : न्यु इयर सेलेब्रेशनसाठी पुण्यात लष्कर आणि डेक्कन भागात वाहतुकीत बदल करण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. रात्री बारापर्यंत शहरात येणाऱ्या जड वाहनांना शहरात येण्यास मनाई करण्यात आली आहे.नववर्षाच्या स्वागतासाठी पुणे शहरात होणाऱ्या मोठ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर लष्कर आणि डेक्कन जिमखाना परिसरात वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. बुधवारी (३१ डिसेंबर) सायंकाळी ५ वाजल्यापासून हे बदल लागू करण्यात आले असून पहाटे ५ वाजेपर्यंत काही प्रमुख रस्त्यांवर वाहनांना प्रवेश बंद असणार आहे. रात्री १२ वाजेपर्यंत शहरात येणाऱ्या जड वाहनांनाही बंदी घालण्यात आली आहे.मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या चालकांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिला आहे.सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता, तसेच फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्त्यावर होणारी गर्दी विचारात घेऊन आज (बुधवारी ३१ डिसेंबर) सायंकाळी ५ वाजल्यानंतर लष्कर आणि डेक्कन जिमखाना भागात वाहतूक बदल करण्यात आले आहेत. मद्यप्राशन करुन वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाईचा इशारा वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिला आहे.

फर्ग्युसन व जंगली महाराज रस्त्यावरील वाहतूक बदल

कोथरूड व कर्वे रस्त्याकडून येणारी वाहतूक खंडुजीबाबा चौक येथे थांबविण्यात येणार आहे. ही वाहतूक विधी महाविद्यालय रस्ता, प्रभात रस्ता व अलका चित्रपटगृहाकडे वळविण्यात येईल.

जंगली महाराज रस्त्यावर होणारी गर्दी लक्षात घेता झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकातून वाहतूक बंद राहणार आहे. पर्यायी मार्ग म्हणून गोखले स्मारक चौक, उपरस्ते, पुणे महापालिका भवन, ओंकारेश्वर मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.फर्ग्युसन रस्त्यावरील गोखले स्मारक चौक ते फर्ग्युसन महाविद्यालय प्रवेशद्वारापर्यंत वाहनांना प्रवेश बंद राहणार असून ही बंदी पहाटे ५ वाजेपर्यंत असणार आहे.

महात्मा गांधी रस्त्यावरील बदल

वाय जंक्शनकडून महात्मा गांधी रस्त्याकडे येणारी वाहतूक १५ ऑगस्ट चौक येथे बंद करण्यात येणार असून ती कुरेशी मशीद व सुजाता मस्तानी चौकाकडे वळविण्यात येईल.

इस्कॉन मंदिराकडून महात्मा गांधी रस्ता परिसरात सायंकाळी ५ नंतर वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे.

महात्मा गांधी रस्त्यावरील १५ ऑगस्ट चौक ते अरोरा टॉवर्स चौकदरम्यान संपूर्णपणे वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

लष्कर परिसरातील वाहतूक बदल

बाबासाहेब आंबेडकर रस्ता तसेच अरोरा टॉवर्सकडे जाणारी वाहतूक बंद राहणार आहे.

व्होल्गा चौकातून महंमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून ती ईस्ट स्ट्रीटवरून इंदिरा गांधी चौकाकडे वळविण्यात येईल.

इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद राहणार असून ती लष्कर पोलीस ठाण्याकडे वळविण्यात येणार आहे.

पोलीस प्रशासनाने नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे तसेच नियमांचे पालन करून सुरक्षितरीत्या नववर्ष साजरे करण्याचे आवाहन केले आहे


 Give Feedback



 जाहिराती