सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
  • मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
  • नाशिकमध्ये प्रचंड गोंधळ, भाजपकडून पोलीस बंदोबस्तात AB फॉर्मचं वाटप; तिकिटाचा काळाबाजार होत असल्याचा इच्छुक उमेदवारांचा आरोप
  • पुण्यात भाजप अन् शिवसेनेची युती तुटली नाही; एबी फॉर्म दिलेत पण....; उदय सामंतांनी युतीचं चित्र केलं स्पष्ट
 विश्लेषण

मतदानापूर्वीच भाजपचे 4 उमेदवार विजयी; मुंबईतील दोन वॉर्डमध्ये भाजप-शिंदेसेनेला मोठा धक्का

डिजिटल पुणे    31-12-2025 15:09:43

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होताच अवघ्या 24 तासांतच महायुतीला मोठा धक्का बसल्याची बातमी समोर आली आहे. मुंबईतील वॉर्ड क्रमांक 211 आणि 212 मध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने या दोन्ही वॉर्डमधून महायुती निवडणुकीच्या रिंगणाबाहेर पडली आहे.वॉर्ड क्रमांक 211 मध्ये शिंदेसेनेच्या उमेदवाराचा अर्ज आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळला. तर वॉर्ड क्रमांक 212 मध्ये भाजपच्या उमेदवार मंदाकिनी खामकर यांचा अर्ज मुदतीनंतर अवघ्या 15 मिनिटे उशिरा दाखल झाल्याने बाद ठरवण्यात आला. एबी फॉर्म मिळाल्यानंतर त्या वेळेत अर्ज सादर करू न शकल्यामुळे भाजपला मोठा फटका बसला आहे.

या वॉर्डमध्ये ठाकरे बंधूंच्या आघाडीकडून मनसेच्या श्रावणी हळदणकर रिंगणात आहेत. काँग्रेस, अखिल भारतीय सेना यांच्यासह अन्य पक्षांचे उमेदवार असले तरी ठाकरे बंधूंच्या एकत्रित ताकदीमुळे श्रावणी हळदणकर यांचे पारडे जड मानले जात आहे. त्यामुळे मुंबईत मनसेला पहिल्या विजयाची चाहूल लागल्याची चर्चा सुरू झाली आहे.

राज्यात भाजपचे चार नगरसेवक बिनविरोध विजयी

मुंबईत उमेदवार बाद होण्यामुळे भाजपला धक्का बसला असला तरी राज्यातील अन्य महानगरपालिकांमध्ये भाजपसाठी दिलासादायक बातमी आहे. मतदानापूर्वीच भाजपचे चार नगरसेवक बिनविरोध विजयी झाले आहेत.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका

प्रभाग 18(अ) मधून रेखा राजन चौधरी

पॅनल क्रमांक 26(क) मधून आसावरी केदार नवरे

दोघांविरोधात एकही उमेदवार नसल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली.

पनवेल महानगरपालिका

प्रभाग क्रमांक 18(ब) मधून नितीन पाटील यांची बिनविरोध निवड.

धुळे महानगरपालिका

प्रभाग क्रमांक 1 मधून उज्ज्वला भोसले या भाजपच्या नगरसेवकपदी बिनविरोध निवडून आल्या.

एकीकडे मुंबईत महायुतीला मोठा धक्का बसलेला असताना, दुसरीकडे राज्यात भाजपने मतदानापूर्वीच चार जागांवर विजय मिळवत आपली ताकद दाखवून दिली आहे. मुंबईतील या घडामोडींमुळे निवडणूक रणधुमाळी आणखी रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.


 Give Feedback



 जाहिराती