सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
  • मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
  • नाशिकमध्ये प्रचंड गोंधळ, भाजपकडून पोलीस बंदोबस्तात AB फॉर्मचं वाटप; तिकिटाचा काळाबाजार होत असल्याचा इच्छुक उमेदवारांचा आरोप
  • पुण्यात भाजप अन् शिवसेनेची युती तुटली नाही; एबी फॉर्म दिलेत पण....; उदय सामंतांनी युतीचं चित्र केलं स्पष्ट
 विश्लेषण

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! मोबाईल तपासा; खात्यात पैसे जमा – किती हप्ता मिळाला? जाणून घ्या सविस्तर

डिजिटल पुणे    01-01-2026 13:02:47

पुणे : राज्यातील महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यांमध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्यात आला आहे.नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी असे तीन महिन्यांचे एकत्रित ४,५०० रुपये मिळणार, अशी अपेक्षा लाभार्थ्यांमध्ये होती. मात्र प्रत्यक्षात फक्त १,५०० रुपयांचा एकच हप्ता खात्यात जमा झाल्याचे दिसून येत आहे.

बुधवारी (ता. ३१ डिसेंबर) सायंकाळी राज्यभरातील अनेक महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचे हप्ते प्रलंबित होते, त्यामुळे दोन्ही महिन्यांचे मिळून ३,००० रुपये जमा होतील, अशी चर्चा होती. तसेच जानेवारीचा हप्ता देखील एकत्र येईल, अशी अपेक्षा होती. मात्र वर्षाच्या शेवटी सरकारकडून फक्त नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देण्यात आला आहे.यामुळे काही महिलांमध्ये नाराजी असली, तरी किमान १,५०० रुपये खात्यात जमा झाल्याने अनेक लाडक्या बहिणी समाधान व्यक्त करत आहेत.

पैसे जमा झाल्याचा SMS आला नसेल? असे करा बॅलन्स चेक

कधी कधी तांत्रिक अडचणी किंवा बँक सर्व्हरमुळे पैसे जमा झाल्याचा SMS उशिरा येतो किंवा येतच नाही. अशा वेळी खालील पद्धती वापरून बॅलन्स तपासू शकता 

 बँक पासबुक अपडेट करा – जवळच्या शाखेत जाऊन किंवा पासबुक प्रिंट करून

 मोबाईल बँकिंग / UPI अ‍ॅप – PhonePe, Google Pay किंवा बँकेचे अधिकृत अ‍ॅप

 बँकेचा बॅलन्स चेक नंबर – SMS किंवा मिस्ड कॉलद्वारे

 ATM मशीन – Last Transaction / Mini Statement तपासा

 इंटरनेट बँकिंग – Mini Statement किंवा Account History मध्ये पाहा

लाडक्या बहिणींना नवीन वर्षाच्या तोंडावर मोठा झटका!

लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी (e-KYC) करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी ३१ डिसेंबर २०२५ ही शेवटची तारीख होती.

 ज्या महिलांनी मुदतीपूर्वी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही,

 ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही,

अशा महिलांना १ जानेवारी २०२६ पासून लाडकी बहीण योजनेचा लाभ कायमस्वरूपी बंद होण्याची शक्यता आहे. नियमांनुसार अशा लाभार्थींना ‘अपात्र’ ठरवले जाऊ शकते.आता ई-केवायसीसाठी पुन्हा मुदतवाढ मिळणार का? याकडे सर्व लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे.

 महत्त्वाची सूचना:

लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी आधार-बँक लिंक आणि ई-केवायसी तात्काळ तपासून घ्या.


 Give Feedback



 जाहिराती