सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
  • मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
  • नाशिकमध्ये प्रचंड गोंधळ, भाजपकडून पोलीस बंदोबस्तात AB फॉर्मचं वाटप; तिकिटाचा काळाबाजार होत असल्याचा इच्छुक उमेदवारांचा आरोप
  • पुण्यात भाजप अन् शिवसेनेची युती तुटली नाही; एबी फॉर्म दिलेत पण....; उदय सामंतांनी युतीचं चित्र केलं स्पष्ट
 राजकारण

मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा आशुतोष रोखठोक; “हट्टी मुलाचं ऐकलं जातं, समंजसाला माघार घ्यावी लागते”

डिजिटल पुणे    01-01-2026 17:33:03

ठाणे :  ठाणे महानगरपालिका निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 19 मधून उमेदवारी न मिळाल्यानंतर खासदार व माजी महापौर नरेश म्हस्के यांचे पुत्र आशुतोष नरेश म्हस्के यांनी भावनिक फेसबुक पोस्ट लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. उमेदवारीच्या चर्चेला पक्षांतर्गत विरोध झाल्यानंतर अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आशुतोष म्हस्के यांना तिकीट न देण्याचा निर्णय घेतला.

आनंदनगर, गांधीनगर, कुष्ठरुग्ण वसाहत आणि आसपासचा परिसर म्हणजेच आपले घर-परिवार असल्याचे सांगत आशुतोष यांनी, “वडील महापौर झाल्यापासून प्रभागात सातत्याने काम केले. प्रत्येक कुटुंबाशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. खासदार झाल्यानंतर या प्रभागाचे प्रतिनिधित्व करण्याची नागरिकांची इच्छा होती,” असे नमूद केले.

पक्षनिष्ठेबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका मांडत, “आम्ही शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली वाढलो. कोणतीही अपेक्षा न ठेवता काम केले,” असे म्हटले. तसेच मेंटल हॉस्पिटल परिसर, रघुनाथ नगर, हजुरी परिसरातही संपर्क ठेवून काम केल्याचे त्यांनी सांगितले.

तिकीट न मिळण्याबाबत सूचक भाष्य करत ते म्हणाले, “कुटुंबात हट्टी मुलाचं लगेच ऐकलं जातं; समंजस मुलाला बरेचदा माघार घ्यावी लागते. कदाचित माझ्यात काहीतरी कमी असेल किंवा मी त्या योग्यतेचा नसेन.” मात्र कोणावरही राग नसल्याचे स्पष्ट करत, पक्ष देईल ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.शेवटी नागरिकांना उद्देशून ते म्हणाले, “तुमची नाराजी मी समजू शकतो. मी सदैव तुमच्यासाठी उपलब्ध आहे. संधी नसेल मिळाली तरी कणा ताठ आहे. पाठीवर हात ठेवा, फक्त ‘लढ’ म्हणा.”या पोस्टमुळे ठाण्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आले असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आशुतोष म्हस्के यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती