सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
  • मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
  • नाशिकमध्ये प्रचंड गोंधळ, भाजपकडून पोलीस बंदोबस्तात AB फॉर्मचं वाटप; तिकिटाचा काळाबाजार होत असल्याचा इच्छुक उमेदवारांचा आरोप
  • पुण्यात भाजप अन् शिवसेनेची युती तुटली नाही; एबी फॉर्म दिलेत पण....; उदय सामंतांनी युतीचं चित्र केलं स्पष्ट
 शहर

प्रशांत सुदामराव जगताप यांच्या प्रचाराची जोरदार सुरुवात !

डिजिटल पुणे    02-01-2026 10:45:28

पुणे : काँग्रेस - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आघाडीचे वानवडी -साळुंखे विहार प्रभाग क्रमांक १८ मधील अधिकृत उमेदवार ,माजी महापौर प्रशांत सुदामराव जगताप यांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळीच प्रचाराचा जोरदार प्रारंभ केला.

वानवडी गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराजांचे आशीर्वाद घेऊन आज महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला.घरातील ज्येष्ठांचे ,वानवडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास अभिवादन करून महाराजांचे आशीर्वाद घेतले.वानवडी येथील महात्मा ज्योतिराव फुले सांस्कृतिक भवन येथील महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  या प्रभागातील उमेदवार सौ.रत्नप्रभा जगताप,  साहिल केदारी,सौ.शमिका जांभुळकर यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी,अभय छाजेड,नानासाहेब जगताप ,शिवाजी (अण्णा ) केदारी उपस्थित होते. 

प्रशांत जगताप म्हणाले,'काँग्रेस - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून आम्ही वानवडी-साळुंखे विहार प्रभागातील नागरिकांच्या सेवेसाठी वचनबद्ध आहोत. भारतीय संविधानाला स्मरून, शिव - शाहू - फुले - आंबेडकर यांच्या समतेच्या विचाराचा अंगीकार करून आम्ही सर्वसमावेशक विकासासाठी व सर्वांगीण प्रगतीसाठी सज्ज आहोत. ही निवडणूक म्हणजे केवळ एखाद्या पदासाठी सुरू असलेली धडपड नाही, महात्मा फुलेंनी आपल्याला दिलेल्या समतेच्या विचारांची जपणूक करण्याचा हा लढा आहे. या लढ्यात आम्हाला यश मिळावे अशी यावेळी त्यांनी प्रार्थना केली ! सर्वाना नवीन वर्ष आणि शौर्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यात भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. आपल्या माता भगिनींच्या जीवनात ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करणारा हा दिवस "फुले दांपत्य सन्मान दिन" म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या महान कार्यास देखील प्रशांत जगताप यांनी विनम्र अभिवादन केले.

*वानवडीला काय मिळाले* ?

प्रचार शुभारंभ केल्यावर भाषण करताना प्रशांत जगताप म्हणाले,'भाजपाकडे खासदार ,आमदार ,शंभर नगरसेवक असताना शहराला आणि वानवडीला काय मिळाले,याचा विचार केला पाहिजे. ही निवडणूक भ्र्रष्टाचार आणि दादागिरीच्या विरोधातील आहे.पुणेकरांची नागरी समस्यांतून सोडवणूक करायची आहे.त्यासाठी काँग्रेस हा एकमेव पर्याय आहे.आम्हाला मिळालेल्या निधीची कामे दाखवून देऊ आणि सत्ताधाऱ्यांना अधिक निधी मिळूनदेखील त्यांनी केलेली विकासकामे भैरोबा नाल्यात वाहून गेली का हे सांगावे !


 Give Feedback



 जाहिराती