सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! मुंबईत ठाकरे-पवारांच्या युतीला दे धक्का; उमेदवाराने परस्पर अर्ज माघारी घेतला; निवडणुकांपूर्वीच 1 जागा झाली कमी
  • सूर्याजी पिसाळसारखा मिंधे 400 वर्ष लक्षात राहिल, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर प्रहार, मोदींसह शाहांवरही टीका
  • पुण्यात भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध; मंजुषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप विजयी
  • मोठी बातमी : घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये, 700 स्के. फू. घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ, तरुणांना लाख रु सहाय्यता निधी, ठाकरेंचा मुंबईसाठी जाहीरनामा
  • मोठी बातमी : मविआला मोठा धक्का, तब्बल 7 उमदेवारांची माघार, पनवेलमध्ये भाजपचा बिनविरोध धमाका
 क्राईम

जीन्स घातल्याच्या कारणावरून विधवा महिलेला सासू-दीराकडून बेदम मारहाण; पुण्यात धक्कादायक घटना

डिजिटल पुणे    02-01-2026 16:39:43

पुणे : पुण्यातील सहकारनगर परिसरातून महिलांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर झालेल्या हिंसाचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन वर्षांपूर्वी पतीचे निधन झालेल्या ३३ वर्षीय विधवा महिलेने जीन्स परिधान केल्याच्या कारणावरून सासू, दीर आणि मुलीने तिला बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. या मारहाणीत महिलेचा हात फ्रॅक्चर झाला असून तिला उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला कचरावेचक म्हणून काम करते व ती चार मुलांसह तळजाई वसाहत परिसरात राहते. ३० डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ती जीन्स घालून घराबाहेर उभी असताना सासू सविता तेथे आली. जीन्स घातल्याच्या रागातून सासूने सुनेचे केस ओढत तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी तिने महिलेच्या चारित्र्यावरही संशय व्यक्त करत शिवीगाळ केली.

मारहाणीदरम्यान पीडितेने आरडाओरडा केल्यानंतर तिची मोठी मुलगी घटनास्थळी आली. मात्र आईला वाचवण्याऐवजी ती आजीसोबत मिळून आईला मारहाण करू लागली. त्याच वेळी दीराने महिलेचा डावा हात पिरगळल्याने मनगटाजवळील हाड मोडले. आरोपींनी महिलेच्या मुलांनाही मारहाण केली तसेच तिचा मोबाईलही काढून घेतला.

या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून सहकारनगर पोलीस ठाण्यात सासू, दीर आणि मुलीविरोधात मारहाण, शिवीगाळ आणि गंभीर दुखापतीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वैद्यकीय तपासणीत महिलेच्या मनगटाचे हाड फ्रॅक्चर झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.दरम्यान, या घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून पतीच्या निधनानंतर महिलांच्या वैयक्तिक आयुष्यावर होणाऱ्या हिंसाचाराचा हा गंभीर प्रकार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती