पुणे : पुणे-नगर महामार्ग: या मार्गावर शौर्य दिनानिमित्त वाहतूक निर्बंध (Restrictions) आणि वळणे (Diversions) असतात.जड वाहनांसाठी: मुंबई/पुणेकडून नगरकडे जाणाऱ्या जड वाहनांना शिरूर,न्हावरा, चौफुला, यवत मार्गे जावे लागते,तर नगरकडून पुण्याकडे येणाऱ्या वाहनांनाही याच मार्गावरून वळवले जाते असे सांगितल्या जाते.हलक्या वाहनांसाठी: मुंबईकडून येणाऱ्या हलक्या वाहनांसाठी चाकण-खेड-पाबळ-शिरूर किंवा चाकण-महालुंगे-विश्रामवाडी असे पर्यायी मार्ग असतात.पर्यायी मार्ग: नाशिक फाटा-खडकी-येरवडा-लोणीकंद हा मार्गही काहीवेळा वापरला जातो.शौर्य दिनाच्या काळात,पुणे पोलीस आणि वाहतूक पोलीस मार्गांवर नियंत्रण ठेवतात आणि पार्किंगची सोय करतात.या दिवशी PMPML (पुणे महानगर परिवहन महामंडळ) मोफत बस सेवा देखील पुरवते.
ही सर्व कागदावर असते. प्रत्येकक्ष यांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. भीमा कोरेगाव रोड हा पुणे-नगर महामार्गाचा एक भाग असून, १ जानेवारी रोजीच्या शौर्य दिनामुळे तो वाहतुकीसाठी खूप चर्चेत असतो आणि त्यानुसार पर्यायी मार्गांची माहिती महत्त्वाची ठरते.ती नसल्यामुळे निळे,पंचशील झेंडे दिसली की ब्रेरीकिट लावले जातात आणि रास्ता बंद आहे पुढे जाऊन उजवीकडे ,डावीकडे जा सांगितले जाते. वीस मिनिटात भीमा कोरेगाव विजय स्तंभा ला जाण्यासाठी दोन अडीच तास वेळ जातो. पार्किंग ची व्यवस्था सात ते आठ किलोमीटर वर केली जाते. आणि चार किलोमीटर वर आहे असे सांगितले जाते. ही जाणूनबुजून भीमा कोरेगाव विजय स्तंभावर येणाऱ्या भीम सैनिकाची अडवणूक असल्याचे दिसून येते. प्रथम आम्ही भांडुप धम्म उपासिका संघाच्या वतीने आम्ही पोलिस प्रशासनाचा निषेध करतो.
असे सुनीता उदेभान तायडे,ज्योति दिलीप थाटे,कोकिळा महादेव बांगर, चंद्रकला सागर तायडे,सुषमा संजय वाकोडे यांनी सांगितले.१ जानेवारी सकाळी चार वाजता पुण्याच्या पुढे होते २० किलोमीटर वर भीमा कोरेगांव होते.पोलिसांनी रोड बंद केला.तीन तास फिरावे लागले.पोलिसांशी या महिलांनी प्रचंड वाद केला.पोलिसांचे मानणे वरुन आदेश आला.लोक सकाळी सकाळी विजय स्तंभा अभिवादन करून निघून जातात.पण पोलिसांच्या मनुवादी मानसिकतेमुळे शौर्य दिनानिमित्त वाहतूक मार्गवर पोलिसाकडून जाणूनबुजून कोंडी करून लाखों अनुयायांना नाहक त्रास दिला जातो.ही स्पष्ट दिसून येत आहे.याचा अनेकांनी आपसात चर्चा करून निषेध केला.पण यावर ठोस निर्णय घेण्यासाठी महिला मंडळ लवकरच बैठकीचे नियोजन करणार आहे.