सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! मुंबईत ठाकरे-पवारांच्या युतीला दे धक्का; उमेदवाराने परस्पर अर्ज माघारी घेतला; निवडणुकांपूर्वीच 1 जागा झाली कमी
  • सूर्याजी पिसाळसारखा मिंधे 400 वर्ष लक्षात राहिल, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर प्रहार, मोदींसह शाहांवरही टीका
  • पुण्यात भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध; मंजुषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप विजयी
  • मोठी बातमी : घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये, 700 स्के. फू. घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ, तरुणांना लाख रु सहाय्यता निधी, ठाकरेंचा मुंबईसाठी जाहीरनामा
  • मोठी बातमी : मविआला मोठा धक्का, तब्बल 7 उमदेवारांची माघार, पनवेलमध्ये भाजपचा बिनविरोध धमाका
 जिल्हा

‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादुर ३५० वा शहीदी समागम कार्यक्रम २५ जानेवारीला

डिजिटल पुणे    03-01-2026 11:57:04

मुंबई : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २५ जानेवारी रोजी कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाची सुरूवात ३ जानेवारी  रोजी दुपारी १२ वाजता आरंभता की अरदास या विधीने असर्जन परिसर मामा चौक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मोदी मैदान येथे होणार आहे.आरंभता की अरदास विधी तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वाराचे पंचप्यारे यांच्या हस्ते आणि सिख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल,वाल्मीकि, भगत नामदेव व उदासीन समाज-संप्रदाय या नऊ समाजाच्या संतांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

या  विधीच्या माध्यमातून “हिंद-दी-चादर” उपक्रमास औपचारिक व  प्रारंभ तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा अबचलनगर नांदेड, मुख्य जथ्थेदार संत बाबा कुलवंत सिंघजी, भाई जोसिंदर सिंघजी, भाई राम सिंघजी, भाई कश्मिर सिंघजी, भाई गुरमीत सिंघजी, गुरुद्वारा लंगर साहिबचे संतबाबा बलविंदर सिंघ यांच्या हस्ते होणार आहे.

यावेळी महेंद्रजी रायचुरा, विधान परिषद सदस्य बाबुसिंग महाराज, क्षेत्रीय समिती अध्यक्ष डॉ. विजय सतबीर सिंग, हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, सरजीत सिंघ गिल आणि जिल्हाधिकारी राहूल कर्डीले, पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार, क्षेत्रीय समिती पदाधिकारी, इतर वरिष्ठ अधिकारी व राज्यस्तरीय समिती सदस्य इतर अधिकारी  यांची उपस्थिती राहणार आहे.

“हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे रविवार दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. मुख्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक पूर्वतयारी व नियोजनाला वेग देण्यात आला असून सुरक्षा, वाहतूक तसेच कार्यक्रमस्थळ व्यवस्थापनाबाबत सर्व संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.


 Give Feedback



 जाहिराती