नाशिक : राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज दिंडोरी तालुक्यात मोहाडी येथील सह्याद्री फार्म येथे भेट घेऊन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांच्यासोबत नैसर्गिक शेतीच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा केली. यावेळी, त्यांनी सह्याद्री फार्मच्या वाटचालीचा प्रवास त्यांच्याकडून जाणून घेतला.राज्यपाल देवव्रत यांनी शुक्रवारी दुपारी सह्याद्री फार्म येथे भेट घेऊन तेथील विविध प्रकल्पांना भेटी देत नैसर्गिक शेतीचे प्रयोग पाहिले. फळावर केली जाणारी प्रक्रिया, प्रोसेसिंग युनिट्स, निर्यात, उपलब्ध बाजारपेठ, शेतकऱ्यांना केले जाणारे मार्गदर्शन याबाबत त्यांनी शिंदे यांच्याकडून जाणून घेतले. राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपमुख्य वनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन यांच्यासह अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.राज्यपाल देवव्रत यांनी सह्याद्री फार्म रब्बीत असलेल्या उपक्रमाची अतिशय तपशीलवार माहिती घेतली आणि काही सूचनाही केल्या. त्यांनी नैसर्गिक शेतीसाठी केंद्र आणि राज्य शासन राबवित असलेल्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही केले.