सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? ठाकरे गटाचा अमित साटमांवर हल्लाबोल
  • उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
  • दिवंगत वडिलांवर भाजपकडून टीका होताच विलासरावांच्या लेकानं ऐकवलं, रितेश देशमुखनं सुनावल्यानंतर रवींद्र चव्हाणांची सपशेल दिलगिरी,
  • मनसेला आणखी एक धक्का, दोघांचा शिवसेनेत प्रवेश; माजी आमदारानेही भाजप सोडली, शिंदेंच्या उपस्थितीत भगवा हाती
  • मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
 क्राईम

फेसबुक लाईव्ह सुरू असतानाच ट्रॅक्टर ट्रॉली अंगावरून गेली; रीलस्टार गणेश डोंगरे यांचा जागीच मृत्यू

डिजिटल पुणे    05-01-2026 11:46:04

बीड : बीड जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली असून ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली सापडून ऊसतोड कामगार तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, मृत तरुण हा सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेला रीलस्टार गणेश डोंगरे होता आणि अपघाताच्या वेळी त्यांची पत्नी फेसबुक लाईव्ह करत होती. या भीषण घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. दरवर्षी ऊस हंगामात हजारो कुटुंबे उदरनिर्वाहासाठी राज्यातील विविध भागांत स्थलांतर करतात. वडवणी तालुक्यातील डोंगरेवाडी (सोन्नाखोटा) येथील रहिवासी गणेश डोंगरे आणि त्यांची पत्नी अश्विनी हेही आपल्या कुटुंबाच्या पालनपोषणासाठी ऊसतोडणीसाठी बाहेर गेले होते. मेहनत, कष्ट आणि स्वप्नांनी भरलेले आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त झाले.

कुटुंबाचा कर्ता पुरुष काळाच्या पडद्याआड

गणेश डोंगरे यांच्याकडे केवळ एक एकर शेती होती. वृद्ध आई-वडील, पत्नी आणि तीन चिमुकल्या मुलींची जबाबदारी त्यांच्यावर होती. गावातील उत्पन्न अपुरे पडत असल्याने हे दाम्पत्य गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन ऊसतोडणीचे काम करत होते. पत्र्याच्या शेडमध्ये राहून, हालअपेष्टा सहन करत त्यांनी कुटुंबासाठी संघर्ष सुरू ठेवला होता.

ट्रॅक्टर ट्रॉली अंगावरून गेल्याने मृत्यू

यावर्षी गणेश आणि अश्विनी हे लातूर जिल्ह्यातील एका साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊसतोडणी करत होते. शनिवारी दुपारच्या सुमारास ऊसाने भरलेला ट्रॅक्टर माप होण्यासाठी थांबलेला असताना, जवळून जाणाऱ्या दुसऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली अचानक नियंत्रण सुटून गणेश डोंगरे यांच्या अंगावर कोसळली. या भीषण अपघातात गणेश यांचा जागीच मृत्यू झाला, तर एक अन्य कामगार गंभीर जखमी झाला.

पत्नी फेसबुक लाईव्ह करत असतानाच दुर्घटना

या घटनेला अधिक वेदनादायक बनवणारी बाब म्हणजे, अपघाताच्या वेळी पत्नी अश्विनी फेसबुकवर लाईव्ह होती. लाईव्ह सुरू असतानाच ट्रॉली गणेश यांच्या अंगावर पडली आणि काही क्षणांतच होत्याचं नव्हतं झालं. पतीचा मृत्यू डोळ्यादेखत घडताच अश्विनीवर जणू दुःखाचा डोंगर कोसळला. हा लाईव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण बीड जिल्हा हादरून गेला.या अपघातामुळे वृद्ध आई-वडील, पत्नी आणि तीन चिमुकल्या मुलींवर दुःखाचे सावट पसरले असून प्रशासनाकडून मदतीची मागणी केली जात आहे. ऊसतोड कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


 Give Feedback



 जाहिराती