सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पालिकेत मोजक्याच लोकांना टेंडर दिलं जात, अजित पवारांचा हल्लाबोल, पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी एक अलार्म पाच काम कॅंपेन सुरु
  • 'उमेदवारी मागे घे, मी कुठल्या पदावर माहितीये ना, मुख्यमंत्र्यालाही मी बोलवल्यावर यावं लागतं'; राहुल नार्वेकरांवर धमकावल्याचा आरोप
  • सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी
  • आधी स्वतःच्या लेकाचा पराक्रम पाहा; भ्रष्टाचार लपवण्यासाठीच भाजपमध्ये आलात – महेश लांडगेंचे अजित पवारांना खुले आव्हान
  • फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
 जिल्हा

नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतीमुळे तळा शहराच्या वैभवात भर – उपमुख्यमंत्री अजित पवार

डिजिटल पुणे    06-01-2026 10:40:32

रायगड/अलिबाग :  नगरपंचायतीची प्रस्तावित प्रशासकीय इमारत ही तळा शहराच्या वैभवात भर घालणारी, दर्जेदार आणि भविष्याचा विचार करून उभारण्यात येईल, तसेच या प्रशासकीय इमारतीमुळे नागरिकांना एकाच छताखाली विविध सेवा-सुविधा उपलब्ध होणार असून प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.नागरी सेवा व सुविधा योजनेअंतर्गत तळा नगरपंचायतीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजन सोहळा उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते तळा येथे पार पडला त्यावेळी ते बोलत होतेयावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, तळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष माधुरी घोलप, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, नगरपंचायत सदस्य-सदस्या, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल आदी मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाली असून ऐतिहासिक वारसा लाभलेल्या तळा तालुक्याला विशेष महत्त्व आहे. तळागड किल्ला हा मराठा साम्राज्याच्या काळात टेहळणी व संरक्षणाचे महत्त्वाचे केंद्र होते. या ऐतिहासिक साक्षीने नटलेला तळा परिसर आज हिरवीगार शेती, निसर्गसौंदर्य आणि सर्वांच्या प्रयत्नांमुळे विकासाच्या नव्या वाटेवर वाटचाल करत आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी आणि पालघरपर्यंत पसरलेले निसर्गसौंदर्य, समुद्रकिनारे, घनदाट हिरवी झाडी व पावसाळ्यातील धबधबे यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत आहेत.

सरकारच्या माध्यमातून राज्याचा सर्वांगीण विकास, प्रगती आणि लोकांचे प्रश्न सोडविण्यावर भर देण्यात येत आहे. उद्योगातून तरुणांच्या हाताला रोजगार मिळण्याबरोबर बचत गटांच्या माध्यमातून महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.CIIIT प्रकल्पामध्ये टाटा कंपनी आणि राज्य सरकारच्या माध्यमातून तरुणांना आधुनिक शिक्षण दिले जात आहे, AI चा वापर जगाने स्वीकारला आहे. आपले तरुण या बदलासाठी तयार झाले पाहिजेत, यासाठी सरकार काम करत आहे.

तळा नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी शासनाकडून 8.50 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्यापैकी ५० टक्के निधी वितरित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. उभारण्यात येणारी प्रशासकीय इमारत अत्यंत उत्कृष्ट दर्जाची असावी व नागरिकांची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, अशा सूचनाही त्यांनी संबंधित विभागाला दिल्या. ग्रामदैवत आई चंडिका माता मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, सन-2019 मध्ये राज्यमंत्री म्हणून संधी मिळाल्यानंतर वावे धरणातून तळा शहरासाठी 13 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली. ही योजना पुढील सहा महिन्यांत पूर्ण होऊन संपूर्ण तळा शहराला शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे. उपमुख्यमंत्री पवार यांच्या माध्यमातून तळा तालुक्यातील पुसाटी गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी सुमारे 85 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच, तळागड किल्ल्याचा ताबा केंद्र सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडून महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडे घेऊन गड विकासाचा मार्ग मोकळा करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी खासदार सुनील तटकरे म्हणाले की, तळा तालुक्यातील  नागरिकांचे होणारे स्थलांतर ही  चिंतेची बाब आहे. परंतु, येथे पुढील काळात येथील परिसरात उद्योगाच्या माध्यमातून ही दूर करण्यात येईल.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन 2024–25 अंतर्गत मोदी तलावाच्या सुशोभिकरण कामाचे भूमिपूजन पार पडले. यावेळी नगरपंचायत परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


 Give Feedback



 जाहिराती