पुणे : ‘तेर ऑलिम्पियाड २०२५–२६’ या पर्यावरण विषयक राष्ट्रीय ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन शुक्रवार,दि.९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत पत्रकार भवन सभागृह, गांजवे चौक(नवी पेठ) येथे होणार आहे.या पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने मार्गदर्शनपर विचारही ते मांडणार आहेत.
तेर पॉलिसी सेंटर आणि टाटा मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात पर्यावरण संवर्धन आणि जनजागृतीच्या दृष्टीने देशपातळीवर हे ऑलिम्पियाड ऑनलाईन स्वरूपात आयोजित करण्यात आले होते,अशी माहिती संस्थापक डॉ.विनिता आपटे यांनी पत्रकाद्वारे दिली.देशभरातून एकूण ४ लाख विद्यार्थी विविध गटातून सहभागी झाले.टॅबलेट,मोबाईल,हार्ड ड्राइव्ह,स्मार्ट वॉच,पेन ड्राइव्ह असे पारितोषिकांचे स्वरूप आहे.या उपक्रमाचे हे ११ वे वर्ष आहे.
या कार्यक्रमात पर्यावरणविषयक जनजागृतीसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शाळाना,शिक्षकांना गौरविण्यात येणार आहे. देशभरातील विविध राज्यांमधून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला असून, पर्यावरण संरक्षण, शाश्वत विकास आणि नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन या विषयांबाबत त्यांची जागरूकता वाढविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.