सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
  • पालिकेत मोजक्याच लोकांना टेंडर दिलं जात, अजित पवारांचा हल्लाबोल, पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी एक अलार्म पाच काम कॅंपेन सुरु
  • 'उमेदवारी मागे घे, मी कुठल्या पदावर माहितीये ना, मुख्यमंत्र्यालाही मी बोलवल्यावर यावं लागतं'; राहुल नार्वेकरांवर धमकावल्याचा आरोप
  • सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी
  • आधी स्वतःच्या लेकाचा पराक्रम पाहा; भ्रष्टाचार लपवण्यासाठीच भाजपमध्ये आलात – महेश लांडगेंचे अजित पवारांना खुले आव्हान
  • फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
 जिल्हा

‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिब जी: ३५० वे शहिदी समागम शताब्दी वर्ष आणि राज्यव्यापी सोहळा

डिजिटल पुणे    07-01-2026 16:54:13

ठाणे : “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त राज्यातील नांदेड, नागपूर व नवी मुंबई, जि. ठाणे येथे राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभाग व “हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब जी 350 वी शहिदी समागम शताब्दी राज्यस्तरीय समिती”, शीख- सिकलीकर, बंजारा लबाना, मोहियाल, सिंधी व इतर सर्व समाज यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

श्री गुरु तेग बहादूर हे शीख धर्माचे 9 वे गुरू होते, त्यांना “हिंद-दी-चादर” म्हणून ओळखले जाते. श्री गुरु तेग बहादूर यांनी शीख धर्मात प्रार्थना, परोपकार, सेवा, साधेपणा, इतरांच्या सेवेला महत्त्व आणि निर्भीडपणा यांचा प्रचार केला, त्यांचे प्रवचन व भजन यांचा “गुरु ग्रंथ साहिब” यामध्ये देखील समावेश आहे. श्री गुरु तेग बहादूर यांनी 17 व्या शतकामध्ये तत्कालीन शासनकर्त्यांच्या अन्याय व अत्याचाराविरूद्ध आवाज उठवून धर्मस्वातंत्र्य आणि मानवी हक्कांसाठी बलिदान देऊन भारताच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक अस्मितेचे रक्षण केले. त्यांच्या बलिदानामुळे संपूर्ण भारतात तसेच शीख धर्मात शौर्य आणि त्यागाची परंपरा अधिक बळकट झाली. मुघल सम्राटांच्या विरोधात जावून भाई लकीशा बंजारा यांनी नववे गुरु तेग बहादूर यांच्या पवित्र शरीरास आपला तांडा व घर जाळून अग्नी दिला. या बाबीस भारतीय इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे.

श्री गुरु तेग बहादूर यांचे सन 2025 हे 350 वे शहिदी समागम शताब्दी वर्ष असल्याने त्यांचा गौरवशाली इतिहास सर्वांना माहित व्हावा तसेच त्यांनी केलेला प्रचार व दिलेले बलिदान याचे स्मरण होण्याकरिता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याकरिता “हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब जी 350 वी शहिदी समागम शताब्दी तसेच गुरु गोविंदसिंग, गुरु-ता-गद्दी समागम समिती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली. त्यानुषंगाने मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली दि.13 जून 2025 रोजी “हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब जी 350 वी शहिदी समागम शताब्दी तसेच गुरु गोविंदसिंग, गुरु-ता-गद्दी समागम समितीची याबाबत बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे तसेच कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता, राज्यस्तरीय समन्वय समिती, क्षेत्रीय आयोजन समिती व विविध कार्यक्रम आयोजन व्यवस्था समिती इ. समित्या दि. 12 ऑगस्ट 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये स्थापन करण्यात आल्या आहेत.

“हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त राज्यातील नांदेड, नागपूर व नवी मुंबई, जि. ठाणे येथे राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभाग व “हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब जी 350 वी शहिदी समागम शताब्दी राज्यस्तरीय समिती”, शीख- सिकलीकर, बंजारा लबाना, मोहियाल, सिंधी व इतर सर्व समाज यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे ठिकाण व त्यात समाविष्ट असलेले जिल्हे :-

नांदेड – छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, जालना, लातूर, धाराशिव, हिंगोली, बीड, नंदुरबार, धुळे, जळगाव

नागपूर – वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम

नवी मुंबई – मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर, नाशिक

“हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त राज्यातील नांदेड, नागपूर व नवी मुंबई, जि. ठाणे येथे राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभाग व “हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब जी 350 वी शहिदी समागम शताब्दी राज्यस्तरीय समिती शीख-सिकलीकर, बंजारा लबाना, मोहियाल, सिंधी व इतर सर्व समाज यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या 350 व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त नांदेड, नागपूर व नवी मुंबई येथे आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता आवश्यक शिफारशी करण्यासाठी नांदेड, नागपूर व नवी मुंबई जि. ठाणे या तीन ठिकाणी क्षेत्रीय आयोजन समिती स्थापन करण्यात आली आहे.

क्षेत्रीय आयोजन समितीची कार्यकक्षा :-  नवी मुंबई, जि. ठाणे या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांच्या आयोजनाकरिता वेळोवेळी आढावा घेवून कालबद्ध कार्यक्रम निश्चित करणे,कार्यक्रमाच्या अनुषंगाने मार्गदर्शक समिती तसेच आयोजन व्यवस्थापन समित्या स्थापन करण्यासाठी जिल्हास्तर आयोजन व व्यवस्थापन समितीस शिफारस करून त्यांची वेळोवेळी आढावा बैठक घेणे व त्याची माहिती राज्यस्तरीय समितीस व अल्पसंख्याक विकास विभागास सादर करणे.

या कार्यक्रमाचे योग्य नियोजन, परिणामकारक अंमलबजावणी याकरिता आयोजन समन्वय समिती, व्हीआयपी व्यवस्थापन समिती, सभागृह व्यवस्थापन समिती, प्रशासन व्यवस्थापन समिती, मैदान व्यवस्थापन समिती, मंडप व्यवस्थापन समिती, बैठक व स्वागत व्यवस्थापन समिती, अतिथी व्यवस्थापन समिती, निवास व्यवस्थापन समिती, नाव नोंदणी व्यवस्थापन समिती, प्रदर्शनी व्यवस्थापन समिती, प्रचार व प्रसार व्यवस्थापन समिती, दक्षता व्यवस्थापन समिती, महिला सुरक्षा व्यवस्थापन समिती, आपात्कालीन व्यवस्थापन समिती, पाणीपुरवठा व्यवस्थापन समित्ती, स्वच्छता व्यवस्थापन समिती, स्वरुपा व्यवस्थापन समिती, सार्वजनिक परिवहन व्यवस्थापन समिती, जूताघर व्यवस्थापन समिती, लंगर व्यवस्थापन समिती तसेच स्थानिक कार्यक्रमाच्या अनुषंगाने आवश्यकता असलेल्या समित्या स्थापन करण्यासाठी जिल्हास्तर आयोजन व व्यवस्थापन समितीस शिफारस करणे.

हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५१०१०१८५९४२७८१४ असा आहे. तरी या सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 


 Give Feedback



 जाहिराती