सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
  • पालिकेत मोजक्याच लोकांना टेंडर दिलं जात, अजित पवारांचा हल्लाबोल, पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी एक अलार्म पाच काम कॅंपेन सुरु
  • 'उमेदवारी मागे घे, मी कुठल्या पदावर माहितीये ना, मुख्यमंत्र्यालाही मी बोलवल्यावर यावं लागतं'; राहुल नार्वेकरांवर धमकावल्याचा आरोप
  • सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी
  • आधी स्वतःच्या लेकाचा पराक्रम पाहा; भ्रष्टाचार लपवण्यासाठीच भाजपमध्ये आलात – महेश लांडगेंचे अजित पवारांना खुले आव्हान
  • फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
 जिल्हा

उरणच्या डोळ्यांत उमलली 'प्रकाशाची 'नवी पहाट !डोळ्यांच्या आजारांच्या उपचारासाठी उरण मध्ये हॉस्पिटल सुरु ;जनतेच्या मागणीला यश

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी)    08-01-2026 10:51:03

उरण : उरणमध्ये डोळ्यावर उपचार करण्यासाठी अद्ययावत यंत्रणा नसल्याने रूग्णांना उपचारासाठी पनवेल, नवी मुबंई, मुबंई आदी ठिकाणी जावे लागत असे, परंतु ही अडचण आता दूर होऊन द्रोणागिरी नोंदमधील सेकटर 50 मध्ये सर्व सोयींनी सुसज्ज नेक्सव्हिजन सुपर स्पेशलिटी आय हॉस्पिटल चा शुभारंभ नुकताच संपन्न झाला आहे. द्रोणागिरीत नेक्सव्हिजन सुपर स्पेशलिटी आय हॉस्पिटल चा दिमागदार शुभारंभ उरण आणि द्रोणिगिरी परिसरातील हजारो नागरिकांच्या दृष्टीची ओढ आता एका सुवर्ण टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. डोळ्यांच्या गंभीर शस्त्रक्रियांसाठी होणारी मुबंई, नवी मुंबई, पनवेलची वारी आता कायमची थांबली असून रविवार दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी द्रोणागिरीत नेक्सव्हिजन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे लोकार्पण एका मंगलमय सोहळ्यात संपन्न झाले. सदर हॉस्पिटल प्रमुख्य रस्त्यावर व रेल्वे स्टेशन जवळून 5 ते 10 मिनिटांच्या अंतरावर आहे. या ठिकाणी रुग्णाच्या डोळ्यावरील सर्व आजारांवर योग्य व माफक दरात उपचार केले जाणार आहे.

यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या वेळेची बचत होणार आहे. सदर हॉस्पिटलची यापूर्वी वाशी, पनवेल येथे शाखा आहे. त्याठिकाणी उरणहून गेलेल्या रुग्णांनी उरणलाही असे हॉस्पिटल सुरू करण्याची मागणी केली होती. त्यांची ही मागणी आता पूर्ण झाली आहे. "विज्ञानाची कास आणि तज्ञांचा विश्वास" डॉ.नितीन तिवारी आणि त्यांच्या भारतातील नामांकित संस्थांमधून प्रशिक्षित झालेल्या ५ उपविशेषण डॉक्टरांच्या टीमने उरण मध्ये सेवेचे व्रत हाती घेतले आहे येथे मोतीबिंदू रेटीना (पडदा) शस्त्रक्रिया बाल नेत्ररोग तज्ञ , आणि काच बिंदू( ग्लॉकोमा)  यासारख्या जटील  समस्यांवर आता एकाच छताखाली उपचार मिळतील. अत्याधुनिक चष्मा काउंटर आणि अचूक तपासणीमुळे हे रुग्णालय उरण मधील पहिले सर्व सुविधायुक्त नेत्र केंद्र ठरले आहे.

डोळे हे केवळ शरीराचा अवयव नसून ते आपल्या स्वप्नांच्या खिडक्या आहेत नेक्स व्हिजनच्या रूपाने या खिडक्या आता अधिक सुरक्षित आणि स्पष्ट झाले आहेत. ४ जानेवारी २०२६ चा हा दिवस उरणकरांसाठी केवळ एका हॉस्पिटलचे उद्घाटन नाही तर तो एक विज्ञानाचा विश्वास आणि आपल्याच मातीत मिळणाऱ्या जागतिक दर्जेच्या सेवेचा सन्मान. आता प्रत्येक उरणकराची दृष्टी नेक्सव्हिजन च्या प्रकाशात अधिक लख्ख सुंदर होईल हाच या उपक्रमाचा खरा विजय आहे. पत्ता आणि संपर्क नेक्स व्हिजन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल, ऑफिस नंबर ४,५ आणि ६ पहिला मजला, स्काय हेरिटेज प्लॉट नंबर ११९सेक्टर ५० बँक ऑफ महाराष्ट्र जवळ द्रोणागिरी उरण ९९८८७८११२/  ९६१९७३७६१ या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.


 Give Feedback



 जाहिराती