पुणे : भारती विद्यापीठच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी), पुणे यांच्या वतीने ' इंडस्ट्री इन्स्टिट्यूट पार्टनरशिप समिट-२०२६' चे आयोजन शनिवार, दि. १० जानेवारी २०२६ रोजी आयएमईडी(एरंडवणे) येथे करण्यात आले आहे. उद्योगविश्व आणि शिक्षणक्षेत्र यांच्यातील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.,अशी माहिती आयएमईडीचे संचालक डॉ. श्रवण कडवेकर यांनी दिली
या परिषदेचे प्रमुख पाहुणे म्हणून अॅक्सेन्चरचे व्यवस्थापकीय संचालक अमोल जोशी ,मान्यवर वक्ते म्हणून आयसर्टिस कंपनीचे उपाध्यक्ष व हेड-एपीएसी नीरज आठल्ये सहभागी होणार आहेत.भारती अभिमत विद्यापीठाचे कार्यवाह डॉ.विश्वजित कदम, कुलगुरू डॉ .विवेक सावजी, भारती विद्यापीठ रवींद्रनाथ टागोर स्कूल ऑफ एक्सलन्सच्या अध्यक्षा,सौ.स्वप्नाली कदम इत्यादी मान्यवर या परिषदेकरिता उपस्थित राहणार आहेत.
दुपारी दोन वाजता सुरू होणाऱ्या या परिषदेकरिता प्राध्यापक, विद्यार्थी तसेच उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. आयआयपीएस -२०२६ ही परिषद उद्योग व शिक्षण क्षेत्रातील संवाद, सहकार्य आणि ज्ञानविनिमयासाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे.