सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं, सूर्य-चंद्र असेपर्यंत मी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं होऊ देणार नाही
  • राज ठाकरेंनी सांगितला मुंबईचा चेहरामोहरा बदलण्याचा भविष्यातील धडकी भरवणारा प्लॅन
 राजकारण

सनी निम्हण यांच्या पदयात्रेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

डिजिटल पुणे    08-01-2026 18:49:53

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा जोर वाढला असून औंध–बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मध्ये भारतीय जनता पक्ष–रिपब्लिकन पक्ष (आठवले) युतीचे उमेदवार सनी विनायक निम्हण यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यांच्या वतीने आज बोपोडी परिसरात भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रभाग क्रमांक ८ मधील भाजप–रिपाइं (आठवले) युतीचे उमेदवार परशुराम वाडेकर, भक्ति गायकवाड, सपना छाजेड यांच्यासह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

सकाळच्या सत्रात औंध येथील सानेवाडी आय.टी.आय रोड या परिसरात पदयात्रा काढून नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला. तर सायंकाळी बोपोडी मधील मानाजी बाग,भोईटे वस्ती परिसरातील प्रचार करण्यात आला. या वेळी मूलभूत विकास, पायाभूत सुविधा, वाहतूक, स्वच्छता आणि नागरी प्रश्नांवर भर देत उमेदवारांनी आपल्या भूमिकेची माहिती मतदारांना दिली. या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ठिकठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत करत आपल्या समस्या आणि अपेक्षा मांडल्या..


 Give Feedback



 जाहिराती