सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • नवी मुंबई विमानतळास दि.बा.पाटलांचं नाही, नरेंद्र मोदींचं नाव द्यायचंय, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप
  • निवडणूक आयोगानं सांगितलं तर लाडक्या बहिणींचे पैसे 16 तारखेला देणार, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
  • पुण्यात महिला उमेदवाराकडून खास महिलांसाठीचा जाहीरनामा प्रकाशित
  • गाडीच्या टपावर चढून चंद्रकांत पाटील यांनी केले भाषण, पुण्यातील प्रचार फेरी दरम्यानचा व्हिडिओ व्हायरल
  • बारावीचे हॉल तिकीट उद्यापासून मिळणार;इयत्ता बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची हॉल तिकिटे ऑनलाईन पद्धतीने मिळणार ;संबंधित शाळा व ज्युनिअर कॉलेज यांनी हॉल तिकिटांचे प्रिंट आऊट काढून विद्यार्थ्यांना वितरित करावी, राज्य मंडळाची सूचना
  • मोठी बातमी: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न? बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ
 जिल्हा

सोलापूरमध्ये संतापजनक प्रकार : पास विसरल्याने चिमुकल्याला भर हायवेवर बसमधून उतरवले

डिजिटल पुणे    11-01-2026 11:39:47

सोलापूर : सोलापूर–मंगळवेढा एसटी बसमध्ये एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना घडली आहे. पास घरी राहिल्याच्या कारणावरून सातवीत शिकणाऱ्या एका चिमुकल्या विद्यार्थ्याला एसटी कंडक्टरने थेट महामार्गावर बसमधून उतरवल्याचा प्रकार समोर आला आहे.

ब्रह्मपुरी (ता. मंगळवेढा) येथील प्रथमेश राहुल पाटील हा विद्यार्थी शनिवारी सायंकाळी सोलापूर–मंगळवेढा (बस क्रमांक ९४०५) या एसटीने घरी जात होता. प्रवासादरम्यान पास तपासणीवेळी प्रथमेशचा पास चुकून घरी राहिल्याचे लक्षात आले. घाबरलेल्या विद्यार्थ्याने वारंवार “पप्पांना फोन करा, ते पैसे देतील,” अशी विनवणी केली. मात्र कंडक्टरने कोणतीही दखल न घेता सायंकाळच्या वेळी, वाहनांच्या गर्दीत त्याला महामार्गावर उतरवले.अचानक रस्त्यावर उतरवल्याने प्रथमेश भयभीत झाला. अखेर एका दुचाकीस्वाराच्या मदतीने तो कसेबसे घरी पोहोचला. हा प्रकार समजताच पालक, ग्रामस्थ आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.या घटनेप्रकरणी प्रथमेशचे वडील राहुल पाटील यांनी परिवहन मंत्री, परिवहन आयुक्त तसेच संबंधित एसटी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करत दोषी कंडक्टरवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

अचानक रस्त्यावर सोडल्यामुळे प्रथमेश गोंधळून गेला. डोळ्यांत पाणी, मनात भीती आणि आजूबाजूला धावणारी वाहने…अखेर त्याने रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराला हात दाखवला. त्या व्यक्तीच्या मदतीने तो कसेबसे घरी पोहोचला. घरी आल्यानंतर त्याच्या थरथरत्या आवाजात घडलेला प्रकार ऐकून कुटुंबीय हादरून गेले. या घटनेनंतर पालकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. “पास विसरणे ही चूक असू शकते; पण त्यासाठी लहानग्या विद्यार्थ्याला महामार्गावर उतरवणे म्हणजे त्याच्या जीवाशी खेळ आहे,” असा सवाल उपस्थित होत आहे. या प्रकरणी पालक राहुल पाटील यांनी परिवहन मंत्री, परिवहन आयुक्त,जिल्हा आगार प्रमुख व तालुका आगार व्यवस्थापकांकडे लेखी तक्रार दाखल करून संबंधित वाहकावर निलंबनाची कारवाईची मागणी केली आहे. सरकार मोफत पास देते, पण एसटीत माणुसकी कुठे हरवली?, असा सवाल उपस्थित होत आहे.

धडा शिकवणारी कठोर कारवाई करा

एकीकडे राज्य सरकार शालेय विद्यार्थ्यांना मोफत पास, महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना सवलती देत एसटी महामंडळाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. पण दुसरीकडे, एका पाससाठी चिमुकल्याला चक्क महामार्गावर उतरणारे निष्टुर हात या सगळ्या निर्णयांची थट्टा करत आहेत.संवेदनाहीन, मुजोर वर्तनामुळे आज एका मुलाचा जीव धोक्यात आला. उद्या हेच प्रकार कुणाच्या नशिबी येणार, हा प्रश्न प्रत्येक पालकाच्या मनात आहे.अशा घटनांमुळे केवळ एखाद्या कुटुंबाचे नव्हे, तर संपूर्ण एसटी महामंडळाच्या विश्वासार्हतेचे नुकसान होत आहे. आता केवळ चौकशी नव्हे, तर धडा शिकवणारी कठोर कारवाईच आवश्यक असल्याची तीव्र मागणी नागरिकांतून होत आहे.

राज्य सरकार शालेय विद्यार्थ्यांना मोफत पास देत असताना, अशा अमानुष वर्तनामुळे एसटी महामंडळाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. केवळ चौकशी नव्हे, तर धडा शिकवणारी कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.


 Give Feedback



 जाहिराती