सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • नवी मुंबई विमानतळास दि.बा.पाटलांचं नाही, नरेंद्र मोदींचं नाव द्यायचंय, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप
  • निवडणूक आयोगानं सांगितलं तर लाडक्या बहिणींचे पैसे 16 तारखेला देणार, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
  • पुण्यात महिला उमेदवाराकडून खास महिलांसाठीचा जाहीरनामा प्रकाशित
  • गाडीच्या टपावर चढून चंद्रकांत पाटील यांनी केले भाषण, पुण्यातील प्रचार फेरी दरम्यानचा व्हिडिओ व्हायरल
  • बारावीचे हॉल तिकीट उद्यापासून मिळणार;इयत्ता बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची हॉल तिकिटे ऑनलाईन पद्धतीने मिळणार ;संबंधित शाळा व ज्युनिअर कॉलेज यांनी हॉल तिकिटांचे प्रिंट आऊट काढून विद्यार्थ्यांना वितरित करावी, राज्य मंडळाची सूचना
  • मोठी बातमी: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न? बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ
 राजकारण

मोठी बातमी : नितेश राणेंच्या घराबाहेर संशयास्पद बॅग आढळली, पोलिसांचा सखोल तपास सुरू

डिजिटल पुणे    11-01-2026 12:24:47

मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांच्या मुंबईतील ‘सुवर्णगड’ या निवासस्थानाबाहेर एक बेवारस व संशयास्पद बॅग आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून, कोणताही धोका टाळण्यासाठी पोलिसांकडून तातडीने कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, नितेश राणे यांच्या बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ही बॅग बराच वेळ पडून होती. दीर्घकाळ कोणीही बॅग घेऊन न गेल्याने सुरक्षा रक्षकांना संशय आला. त्यांनी तत्काळ स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली.

बॉम्ब शोधक पथक पाचारण

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिसर सील करत बॉम्ब शोधक व नाशक पथकाला पाचारण केले. संशयास्पद बॅग ताब्यात घेऊन तिची सखोल तपासणी सुरू असून, सध्या बॅगेत नेमके काय आहे, याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

सीसीटीव्ही फुटेज तपासात

पोलिसांनी बंगल्याच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, ही बॅग कोणी व कोणत्या उद्देशाने ठेवली, याचा तपास सुरू आहे. प्राथमिक तपास पूर्ण झाल्यानंतरच हा प्रकार निष्काळजीपणाचा आहे की घातपाताचा प्रयत्न, हे स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर गंभीर बाब

नितेश राणे हे त्यांच्या आक्रमक हिंदुत्ववादी भूमिकेमुळे सातत्याने चर्चेत असतात. यापूर्वी त्यांना धमक्याही आल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेत आधीच वाढ करण्यात आलेली आहे. अशा स्थितीत त्यांच्या निवासस्थानाबाहेर संशयास्पद वस्तू आढळणे ही गंभीर बाब मानली जात आहे.

राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया

या घटनेनंतर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत असून, एका कॅबिनेट मंत्र्याच्या घराबाहेर असा प्रकार घडणे चिंताजनक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. मात्र, पोलिस तपास पूर्ण होईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. पुढील तपासातून नेमके काय समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती