थेरगाव (पिंपरी चिंचवड): पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २४ अंतर्गत येणाऱ्या थेरगाव परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रभागातून निशा अनिलेत प्रभू-ताम्हाणे या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्या असून त्यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. त्यांचे निवडणूक चिन्ह सफरचंद असून, थेरगावसह संपूर्ण प्रभागात या चिन्हाला मोठी ओळख मिळत आहे.
निशाताई यांनी थेरगाव परिसरात घरभेटी, नागरिकांशी थेट संवाद, सोसायटी बैठका तसेच स्थानिक प्रश्नांवर चर्चा करत प्रचाराला वेग दिला आहे. यामुळे थेरगावमधील नागरिकांशी त्यांचा थेट संपर्क प्रस्थापित झाला असून, त्यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. केवळ आश्वासनांवर नव्हे, तर आजवर थेरगाव व प्रभाग २४ मध्ये केलेल्या कामांच्या जोरावर त्या मतदारांसमोर जात आहेत, ही बाब नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण करणारी ठरत आहे.

त्यांचे पती अनिकेत प्रभू आणि स्वतः निशाताई यांनी गेल्या काही वर्षांत थेरगाव परिसरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, नागरी सुविधा आणि स्थानिक समस्या सोडवण्यासाठी केलेल्या कामांची पोचपावती आता त्यांना मिळताना दिसत आहे. अनेक नागरिक “थेरगावच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे नेतृत्व” म्हणून त्यांच्याकडे पाहत असल्याचे सांगत आहेत.प्रचारादरम्यान थेरगावमधील महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच तरुण वर्ग मोठ्या संख्येने पुढे येत असून, अपक्ष उमेदवार असूनही निशा प्रभू-ताम्हाणे यांच्या पाठीमागे थेरगावसह संपूर्ण प्रभाग २४ मधून मोठा जनाधार उभा राहत असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. पक्षीय राजकारणापेक्षा स्थानिक विकास, विश्वास आणि कामाला प्राधान्य देणारी भूमिका थेरगावच्या मतदारांना भावत असल्याचे चित्र आहे.

एकूणच, थेरगाव आणि प्रभाग क्रमांक २४ मध्ये निशा अनिलेत प्रभू-ताम्हाणे यांची निवडणूक लढत ही केवळ अपक्ष उमेदवाराची नसून, कामाच्या विश्वासावर उभी राहिलेल्या नेतृत्वाची असल्याचे दिसून येत आहे. वाढता जनसमर्थन पाहता, प्रभाग २४ मधील निवडणूक यावेळी चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत.
