सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • नवी मुंबई विमानतळास दि.बा.पाटलांचं नाही, नरेंद्र मोदींचं नाव द्यायचंय, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप
  • निवडणूक आयोगानं सांगितलं तर लाडक्या बहिणींचे पैसे 16 तारखेला देणार, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
  • पुण्यात महिला उमेदवाराकडून खास महिलांसाठीचा जाहीरनामा प्रकाशित
  • गाडीच्या टपावर चढून चंद्रकांत पाटील यांनी केले भाषण, पुण्यातील प्रचार फेरी दरम्यानचा व्हिडिओ व्हायरल
  • बारावीचे हॉल तिकीट उद्यापासून मिळणार;इयत्ता बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची हॉल तिकिटे ऑनलाईन पद्धतीने मिळणार ;संबंधित शाळा व ज्युनिअर कॉलेज यांनी हॉल तिकिटांचे प्रिंट आऊट काढून विद्यार्थ्यांना वितरित करावी, राज्य मंडळाची सूचना
  • मोठी बातमी: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न? बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ
 जिल्हा

विजय विकास सामाजिक संस्था साकारणार लोकनेते दिबा पाटील स्मृतीवन ;आवश्यक जागेची केली मागणी

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी)    12-01-2026 15:08:29

उरण : भूमीपुत्र प्रकल्पग्रस्तांचे कैवारी स्व. लोकनेते दि. बा. पाटील यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून उरण येथील विजय विकास सामाजिक संस्थेच्या वतीने हजारों वृक्षलागवडीतून निसर्गसेवेतून लोकनेते दि. बा. पाटील स्मृतीवन साकारण्यासाठी पुढाकार घेतला असून याबाबत संस्थेनी उरण वनविभाग, स्थानिक आमदार यांना निवेदन पत्र देवून स्मृतीवनांसाठी आवश्यक जागेची मागणी केली आहे.त्याचप्रमाणे उरण तहसिलदार, जिल्हाधिकारी, विभागीय वनअधिकारी अलिबाग यांनाही निवेदन पत्र पाठविण्यात आल्याचे सांगितले.


विजय विकास सामाजिक संस्थेने आजवर अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत.विविध उपकमात जनतेचा देखील मोठया प्रमाणात सहभाग असतो.विजय विकास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय भोईर यांनी सांगितले की लवकरच राज्याचे वनमंत्री नामदार गणेश नाईक यांची भेट घेवून स्मृतीवनाचा संकल्प आराखडा सादर करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली संबधित विभागाशी पाठपुरवठा करून दिबांचे स्मृतीवन प्रकल्प येत्या २४ जून रोजी दिबांच्या पुण्यस्मरण दिनी वृक्षरोपन लागवडीस सुरूवात करण्यात येईल.

ते पुढे म्हणाले की दिंबाच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून साकारण्यात येणाऱ्या स्मृतीवनात सर्व प्रकारची स्थानिक देशी झाडांचा समावेश असेल, पक्षी प्रेमींसाठी लाभदायक ठरेल, स्थानिक जैवविविधतेच्या संवर्धनासाठी अधिक परिश्रम घेतले जातील. तसेच पर्यटन युक्त निसर्ग सौंदर्याने नटलेला असा स्मृतीवन असेल असे थोडक्यात मत व्यक्त केले.


 Give Feedback



 जाहिराती