सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • नवी मुंबई विमानतळास दि.बा.पाटलांचं नाही, नरेंद्र मोदींचं नाव द्यायचंय, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप
  • निवडणूक आयोगानं सांगितलं तर लाडक्या बहिणींचे पैसे 16 तारखेला देणार, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
  • पुण्यात महिला उमेदवाराकडून खास महिलांसाठीचा जाहीरनामा प्रकाशित
  • गाडीच्या टपावर चढून चंद्रकांत पाटील यांनी केले भाषण, पुण्यातील प्रचार फेरी दरम्यानचा व्हिडिओ व्हायरल
  • बारावीचे हॉल तिकीट उद्यापासून मिळणार;इयत्ता बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची हॉल तिकिटे ऑनलाईन पद्धतीने मिळणार ;संबंधित शाळा व ज्युनिअर कॉलेज यांनी हॉल तिकिटांचे प्रिंट आऊट काढून विद्यार्थ्यांना वितरित करावी, राज्य मंडळाची सूचना
  • मोठी बातमी: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न? बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ
 जिल्हा

थिबा राजा संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत भंते दीपंकर सुमेधो यांची महत्त्वपूर्ण बैठक; ऐतिहासिक जागेचा मुद्दा राज्य–देशपातळीवर नेण्याचा निर्धार

डिजिटल पुणे    13-01-2026 14:31:55

रत्नागिरी:- ब्रह्मदेशचा (आताचा म्यानमार) माजी बौद्ध राजा थिबा मिन याला नजरकैदेत ठेवण्यासाठी ब्रिटीश सरकारने थिबा पॅलेस बांधला होता. थिबा राजांच्या ऐतिहासिक वारशाचे संरक्षण आणि संबंधित जागा वाचविण्यासाठी भंते दीपंकर सुमेधो दिल्ली (कॉडीनेटर म्याममार भारत) यांनी पुढाकार घेतला असून या संदर्भात थिबा राजा संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक दिनांक ९ जानेवारी रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन येथे पार पडली.थिबा राजांची जागा हा केवळ रत्नागिरीपुरता मर्यादित प्रश्न नसून तो महाराष्ट्रासह देशपातळीवरील ऐतिहासिक व सांस्कृतिक मुद्दा असल्याचे मत या बैठकीत मांडण्यात आले.
 
या बैठकीदरम्यान संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भंते दीपंकर सुमेधो यांना संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. त्यावर प्रतिक्रिया देताना भंते सुमेधो यांनी हा लढा राज्यस्तरासह देशपातळीवर उभा करण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. थिबा राजा (थिबा मिन) हा म्यानमार (ब्रह्मदेश) चा शेवटचा राजा होता,ज्याला ब्रिटीशांनी १८८५ मध्ये पदच्युत करून रत्नागिरी,भारतात स्थानबद्ध केले आणि १९१६ मध्ये त्याचा मृत्यू होईपर्यंत तो येथेच होता;त्यामुळे त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही रत्नागिरीची भूमी ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.थिबा राजांचा हा अमूल्य ऐतिहासिक ठेवा जतन करण्याची जबाबदारी सर्वप्रथम बौद्ध समाजाची असल्याचे स्पष्ट करताना, साडेसतरा गुंठ्यांच्या आरक्षणाची मागणी पूर्ववत करण्यात यावी, अशी ठाम भूमिका मांडण्यात आली. त्याचबरोबर संबंधित साडे सहा एकर जागेवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही असा थेट इशाराही देण्यात आला. 
 
थिबा राजा यांच्या शंभराव्या स्मृतिदिनानिमित्त रत्नागिरी येथील थिबा पॅलेस येथे आयोजित कार्यक्रमाची आठवण करून देण्यात आली,भंते दीपंकर सुमेधो यांनी त्यावेळी म्यानमारमधून तब्बल ८५ मान्यवरांना रत्नागिरीत आणण्यासाठी पुढाकार घेतला होता.या कार्यक्रमाला थिबा राजांचे वंशज, म्यानमारचे उपराष्ट्रपती,लष्करप्रमुख तसेच म्यानमार देशाचे भंतेगण भारताचे सामाजिक न्याय मंत्री माननीय रामदास आठवले उपस्थित होते.या यशस्वी आंतरराष्ट्रीय कार्यक्रमामुळे रत्नागिरीचे नाव जागतिक पातळीवर पोहोचल्याचे मत भंते दीपंकर सुमेधो दिल्ली (कॉडीनेटर म्याममार भारत) यांनी उपस्थितांना सांगितले.
 
या बैठकीला भंते दीपंकर सुमेधो यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार धम्म प्रचारक अभ्यासक सागर तायडे, धम्म उपासक चंद्रकांत गमरे,थिबा राजा संघर्ष समितीचे अध्यक्ष एल.व्ही.पवार,कार्याध्यक्ष अनंत सावंत,सचिव अमोल जाधव, शिवराम कदम,आंबुलकर,प्रकाश पवार (पावस), देवेन कांबळे, किशोर पवार, केतन पवार, राजेंद्र कांबळे, रत्नदीप कांबळे,रूपेश कांबळे आदी समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती