सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • नवी मुंबई विमानतळास दि.बा.पाटलांचं नाही, नरेंद्र मोदींचं नाव द्यायचंय, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप
  • निवडणूक आयोगानं सांगितलं तर लाडक्या बहिणींचे पैसे 16 तारखेला देणार, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
  • पुण्यात महिला उमेदवाराकडून खास महिलांसाठीचा जाहीरनामा प्रकाशित
  • गाडीच्या टपावर चढून चंद्रकांत पाटील यांनी केले भाषण, पुण्यातील प्रचार फेरी दरम्यानचा व्हिडिओ व्हायरल
  • बारावीचे हॉल तिकीट उद्यापासून मिळणार;इयत्ता बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची हॉल तिकिटे ऑनलाईन पद्धतीने मिळणार ;संबंधित शाळा व ज्युनिअर कॉलेज यांनी हॉल तिकिटांचे प्रिंट आऊट काढून विद्यार्थ्यांना वितरित करावी, राज्य मंडळाची सूचना
  • मोठी बातमी: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न? बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ
 जिल्हा

डॉ. प्रकाश आमटे: समाजसेवेचा आदर्श.

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी)    13-01-2026 18:18:22

उरण : ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी जे एन पी ए टाऊनशिपमध्ये आयोजित "एक मुक्त संवाद" कार्यक्रमात हेमलकसा येथील त्यांच्या ५० वर्षांच्या संघर्षाचा पट उपस्थितांसमोर मांडला.आदिवासी बांधवांना आरोग्य, शिक्षण आणि आत्मनिर्भरता प्रदान करताना आलेल्या अडीअडचणी आणि त्यातून मार्ग काढताना मिळालेला आनंद त्यांनी व्यक्त केला.
 
"समाजसेवा ही केवळ जबाबदारी नसून ते एक व्रत आहे," असे प्रतिपादन डॉ. आमटे यांनी केले. "आदिवासींच्या अंधारमय जीवनात प्रकाशाचा किरण पोहोचवण्यासाठी केवळ औषधांची नाही तर माणुसकीच्या स्पर्शाची गरज असते," असे ते म्हणाले.डॉ. आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे यांनी हेमलकसा येथील त्यांच्या कामाचा अनुभव सांगितला. त्यांच्या साध्या राहणी आणि उच्च विचारसरणीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या अंतर्गत डॉ. आमटे यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना जीवनातील साधी पण महत्त्वाची तत्वे उलगडली.जे एन पी ए बोर्ड सदस्य  दिनेश पाटील, रवींद्र पाटील, कामगार नेता गणेश घरत, निमंत्रक संगीता पाटील आणि समन्वयक संतोष बहिरा यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले होते.मनीषा जाधव (महाप्रबंधक प्रशासन सचिव), सुरेश बाबू (मुख्य महाप्रबंधक) आणि कॅप्टन बाळासाहेब पवार (उपसंरक्षक) यांची प्रमुख उपस्थिती होती.


 Give Feedback



 जाहिराती