सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • नवी मुंबई विमानतळास दि.बा.पाटलांचं नाही, नरेंद्र मोदींचं नाव द्यायचंय, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप
  • निवडणूक आयोगानं सांगितलं तर लाडक्या बहिणींचे पैसे 16 तारखेला देणार, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
  • पुण्यात महिला उमेदवाराकडून खास महिलांसाठीचा जाहीरनामा प्रकाशित
  • गाडीच्या टपावर चढून चंद्रकांत पाटील यांनी केले भाषण, पुण्यातील प्रचार फेरी दरम्यानचा व्हिडिओ व्हायरल
  • बारावीचे हॉल तिकीट उद्यापासून मिळणार;इयत्ता बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची हॉल तिकिटे ऑनलाईन पद्धतीने मिळणार ;संबंधित शाळा व ज्युनिअर कॉलेज यांनी हॉल तिकिटांचे प्रिंट आऊट काढून विद्यार्थ्यांना वितरित करावी, राज्य मंडळाची सूचना
  • मोठी बातमी: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न? बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ
 राजकारण

पुण्यात उमेदवारांकडून मतदारांना ‘भन्नाट ऑफर्स’

डिजिटल पुणे    14-01-2026 14:41:58

 पुणे :  पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात काही धनाढ्य उमेदवारांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळण केल्याचे प्रकार समोर येत आहेत. काही उमेदवारांकडून चारचाकी गाडी, थायलंड टूर, एक गुंठा जमीन अशा आकर्षक ऑफर्स दिल्या जात असल्याची चर्चा आहे.वाढत्या स्पर्धेमुळे आणि राजकीय ताकद दाखवण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात खर्च केला जात असल्याचे चित्र आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 25 मध्ये पैठणीच्या खेळात विजयी झालेल्या महिलांना हेलिकॉप्टर राईडचे बक्षीस देण्यात आल्याचा प्रकार चर्चेत आला होता. तसेच पुण्याच्या प्रभाग क्रमांक 1 (लोहगाव–धानोरी) येथे एका इच्छुक उमेदवाराने 11 गुंठे जमिनीचे प्लॉट (प्रत्येकी 1100 चौ.फुट) लकी ड्रॉद्वारे देण्याचे आश्वासन दिल्याचे समोर आले आहे.निवडणूक आयोग आणि महापालिका प्रशासनाकडून अशा प्रकारांवर कडक नजर ठेवली जात असून, आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.


 Give Feedback



 जाहिराती