सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : पुण्यात मतदान केंद्रावर गोंधळ! गुरुवार पेठेत मशीन बंद, उमेदवार आक्रमक, लोकशाहीच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह?
  • “भाजपकडून पैसे वाटपाचे व्हिडीओ माझ्याकडे...” – प्रशांत जगताप यांचा गंभीर आरोप
  • : पिंपरी चिंचवड प्रभाग क्रमांक 13 मधील मतदान प्रक्रिया तब्बल पाऊण तास बंद
  • महाराष्ट्रात हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा एकच ब्रँड; मुंबईमध्ये शिवसेना - भाजपची सत्ता येईल : दादा भुसे
  • गायब नाव, पैसे, दबाव... पिंपरी-चिंचवड मतदान केंद्रात गोंधळ, रोहितदादा पवारांचे संतप्त वक्तव्य
 जिल्हा

उरण नगर परिषदेच्या उपगराध्यक्ष पदी रवीशेठ भोईर.

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी)    15-01-2026 10:40:16

उरण : अनेक दिवसापासून उरणचा उपनगराध्यक्ष कोण होणार याची चर्चा उरण मध्ये सुरु होती. शेवटी या चर्चेला पूर्ण विराम मिळाला असून रवीशेठ भोईर यांची उरणच्या उपगराध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे सर्वत्र आनंद उत्साह पहायला मिळाला.उरण नगरपरिषदेच्या उप नगराध्यक्षपदी भाजपचे रवी भोईर यांची बिनविरोध निवड झाली असून त्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे ज्येष्ठ नेते जे.एम म्हात्रे तसेच आमदार महेश बालदी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालकरीता शुभेच्छा दिल्या.उरण नगर परिषद निवडणूक २ डिसेंबर २०२५ रोजी झाली होती त्यात २१ डिसेंबर २०२५ रोजी निवडणुकीचा निकाल लागला. त्यात भाजपचे १२ उमेदवार व महाविकास आघाडीचे ९ उमेदवार व नगराध्यक्ष पदासाठी १ उमेदवार निवडून आले होते. बुधवारी निवडून आलेल्या नगरसेवकांची सर्व साधारणसभा नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली ठेवण्यात आली होती.

उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार होती, परंतु उपनगराध्यक्ष पदासाठी एकच अर्ज आल्याने भाजपचे रवी भोईर यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे नगराध्यक्षांनी जाहीर केले.यानंतर भाजपतर्फे उरण नगर परिषदेपासून मिरवणूक काढण्यात आली होती. पुढे आमदार महेश बालदी यांच्या भाजप संपर्क कार्यालय , स्वामी विवेकानंद चौक, गणपती मंदिर चौक, राजपाल नाका, जरी मरी मंदिर, राघोबा देव मंदिर येथून परत राजपाल नाका, गणपती चौक व पुढे आमदार महेश बालदी कार्यालय येथे सांगता समारोप करण्यात आला.या मिरवणुकीत आमदार महेश बालदी व नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष रवी भोईर यांच्यासह गट नेता जयविन कोळी, उरण शहर अध्यक्ष कौशिक शाह, नगरसेविक सायली म्हात्रे, उरण शहर युवा अध्यक्ष निलेश पाटील, उरण तालुका महिला अध्यक्ष राणी म्हात्रे, निशा म्हात्रे, उरण तालुका मंडळ अध्यक्ष धनेश गावंड, स्नेहल कासारे, आशा शेलार, प्रीतम म्हात्रे,, उरण शहर महिला अध्यक्ष संपूर्णा थळी, जान्हवी पंडित, उरण शहर मंडळ अध्यक्ष प्रसाद भोईर, तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड, पूर्व विभाग अध्यक्ष शशी पाटील, खोपटे माजी सरपंच विशाखा ठाकूर, सुगंधा कोळी, कैलास भोईर, हितेश शाह, मनन पटेल, मकरंद पोतदार, संतोष ओटवकर, सुशांत पाटील, प्रशांत ठाकूर, विशाल पाटेकर, रोहन भोईर, प्रीतम पाटील, योगेश वैंवडे, पुरुशोताम सेवक, अभिषेक जैन, राजेश पाटील, निलेश कदम, दिनेश ठक्कर कुणाल शिसोदिया, हस्तिमल मेहता, देवा घरत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


 Give Feedback



 जाहिराती