सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मतदानानंतर बोटावरील शाई पुसून बोगस मतदानाचा आरोप ;रूपाली चाकणकरांची निवडणूक आयोगाकडे तक्रार; पुणे, मुंबईसह राज्यभरात खळबळ
  • मतदान करुन बाहेर पडताच राज ठाकरे संतापले, उद्वेगाने म्हणाले, 'सगळी सिस्टीम सत्ताधाऱ्यांसाठी काम करतेय'
  • : पुण्यात मतदान केंद्रावर गोंधळ! गुरुवार पेठेत मशीन बंद, उमेदवार आक्रमक, लोकशाहीच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह?
  • “भाजपकडून पैसे वाटपाचे व्हिडीओ माझ्याकडे...” – प्रशांत जगताप यांचा गंभीर आरोप
  • : पिंपरी चिंचवड प्रभाग क्रमांक 13 मधील मतदान प्रक्रिया तब्बल पाऊण तास बंद
  • महाराष्ट्रात हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा एकच ब्रँड; मुंबईमध्ये शिवसेना - भाजपची सत्ता येईल : दादा भुसे
  • गायब नाव, पैसे, दबाव... पिंपरी-चिंचवड मतदान केंद्रात गोंधळ, रोहितदादा पवारांचे संतप्त वक्तव्य
 जिल्हा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीप्रसंगी अडचण आली तरच ‘पाडू’चा वापर

डिजिटल पुणे    15-01-2026 18:09:41

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या मतदान यंत्राद्वारे झालेल्या मतदानाची मोजणी करताना काही तांत्रिक अडचण आल्यास ‘पाडू’ (प्रिंटींग ऑक्सिलरी डिस्प्ले युनिट) या यंत्राचा वापर करून निकाल बघण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र पाडूचा वापर सरसकट केला जाणार नाही. तांत्रिक अडचणीच्या प्रसंगी अत्यंत अपवादा‍त्मकरित्या त्याचा वापर केला जाईल, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडची मतदान यंत्रे केवळ बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठीच वापरली जात आहेत. ही यंत्रे भारत निवडणूक आयोगाची असून ती ‘एम3ए’ या प्रकाराची आहेत. त्यात झालेल्या मतदानाची मतमोजणी कंट्रोल यूनिटला (सीयू) बॅलेट यूनिट (बीयू) जोडूनच करावी, फक्त तांत्रिक अडचण आली तरच अत्यंत अपवादा‍त्मकरित्या पाडूचा वापर करावा, असे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी 140 पाडूंची उपलब्धता करून देण्यात आली आहे. अत्यंत अपवादा‍त्मक परिस्थितीत मतमोजणीसाठी पाडूची गरज भासल्यास कंपन्याच्या तंत्रज्ञांच्या उपस्थितीत त्याचा वापर करावा. त्याचबरोबर पाडूच्या वापराबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना या यंत्राचे प्रात्यक्षिक दाखविण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना प्रात्यक्षिक दाखविले आहे.


 Give Feedback



 जाहिराती