पुणे : राज्यातील 29 महापालिकांसाठी काल मतदान पार पडल्यानंतर आज सकाळपासून सर्वत्र मतमोजणीला सुरुवात झाली आहे. निकाल हळूहळू स्पष्ट होत असून, कोणत्या महापालिकेत कोणाची सत्ता येणार आणि कोण महापौरपदावर विराजमान होणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.मुंबई वगळता राज्यातील इतर सर्व महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना आहे. बहुतांश प्रभाग हे 4 सदस्यीय असून काही ठिकाणी 3 किंवा 5 सदस्यीय प्रभाग आहेत.
पुणे महानगरपालिका निवडणूक निकाल जाहीर होत आहे. पुणे महापालिकेच्या 162 जागांसाठी (52.59 %) टक्के मतदान झालं. पुणे महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी 82 जागांची गरज आहे. हा आकडा कोण गाठणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. पुणे महापालिकेमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांची आघाडी झाली. तर भाजप आणि शिवसेना शिंदे वेगवेगळे लढले. याशिवाय उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसची युती पाहायला मिळाली. अपक्षांची संख्या देखील मोठी आहे.
मतदानाची टक्केवारी (महत्त्वाच्या महापालिका)
मुंबई महापालिका: 52.94%
ठाणे: 56%
पुणे: 52%
पिंपरी-चिंचवड: 58%
नवी मुंबई: 57%
नाशिक: 57%
परभणी: 66%
जालना: 61%
उच्च मतदानामुळे अनेक ठिकाणी चुरशीचे निकाल पाहायला मिळत आहेत.
पुणे महापालिका निकाल अपडेट
पुणे महानगरपालिकेच्या 162 जागांसाठी 52.59% मतदान झाले आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी 82 जागांची आवश्यकता आहे. हा बहुमताचा आकडा कोण गाठणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.
पुण्यातील राजकीय समीकरण
अजित पवार गट राष्ट्रवादी + शरद पवार गट राष्ट्रवादी यांची आघाडी
भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) स्वतंत्र लढत
शिवसेना (उद्धव ठाकरे) + काँग्रेस युती
मोठ्या प्रमाणात अपक्ष उमेदवार मैदानात
प्रभागनिहाय विजयी उमेदवारांची यादी – निकाल जाहीर होताच अपडेट
राज्यातील 29 महापालिका : जागा आणि सत्ता
क्रमांक महापालिकेचं नाव
1 बृहन्मुंबई- एकूण जागा- 227
2 भिवंडी-निजामपूर- एकूण जागा- 90
3 नागपूर – एकूण जागा-151
4 पुणे – एकूण जागा-162
5 ठाणे - एकूण जागा-131
6 अहमदनगर - एकूण जागा-68
7 नाशिक – एकूण जागा-122
8 पिंपरी-चिंचवड - एकूण जागा-128
9 छत्रपती संभाजीनगर - एकूण जागा-113
10 वसई-विरार - एकूण जागा-115
11 कल्याण-डोंबिवली - एकूण जागा-122
12 नवी मुंबई - एकूण जागा-111
13 अकोला - एकूण जागा-80
14 अमरावती - एकूण जागा-87
15 लातूर - एकूण जागा-70
16 नांदेड-वाघाळा - एकूण जागा-81
17 मीरा-भाईंदर - एकूण जागा-96
18 उल्हासनगर - एकूण जागा-78
19 चंद्रपूर - एकूण जागा-66
20 धुळे - एकूण जागा-74
21 जळगाव - एकूण जागा-75
22 मालेगाव - एकूण जागा-84
23 कोल्हापूर - एकूण जागा-92
24 सांगली-मिरज-कुपवाड - एकूण जागा-78
25 सोलापूर - एकूण जागा-113
26 इचलकरंजी – एकूण जागा-76
27 जालना - एकूण जागा-65
28 पनवेल - एकूण जागा-78
29 परभणी – एकूण जागा-65
कोण होणार महापौर?
बहुमत मिळवणाऱ्या पक्षाकडून किंवा आघाडीकडून महापौरपदाचा दावा केला जाणार आहे. काही महापालिकांमध्ये अपक्षांची भूमिका ‘किंगमेकर’ ठरण्याची शक्यता आहे.