सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: पुण्यात आंदेकर गँगच्या उमेदवाराचा विजय, रवींद्र धंगेकरांच्या पत्नीलाच पाडलं
  • प्रभाग क्रमांक 10 मधुन भाजपाचे चार ही उमेदवार विजयी
  • प्रभाग क्रमांक १८ ड मधून अटीतटीच्या लढतीत काँग्रेसचे प्रशांत जगताप विजयी
  • कोल्हापूर प्रभाग क्रमांक 9 मध्ये महायुती सर्व जागांवर विजयी
  • दक्षिण मुंबईत भाजपनं खातं उघडलं! वॉर्ड २१४, २१५ मधून भाजपचा विजय
  • पुणे निवडणूक आयोगाची अधिकृत आकडेवारी ;भाजप 47 ठिकाणी तर राष्ट्रवादी 6 काँग्रेस 3 ठिकाणी आघाडीवर
  • पुणे निवडणूक आयोगाची अधिकृत आकडेवारी; भाजप 27 ठिकाणी तर राष्ट्रवादी 4 ठिकाणी आघाडीवर
  • प्रभाग क्रमांक २५ मध्ये दुसऱ्या फेरीत ही भाजपा उमेदवारांची आघाडी कायम
 शहर

अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचा छात्र सैनिक वैभव घोगरे करणार प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर (राजपथ) संचलन

डिजिटल पुणे    16-01-2026 16:06:02

पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचा सीनियर अंडर ऑफिसर (एस.यु.ओ.) वैभव घोगरे याची प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे कर्तव्यपथ (राजपथ) संचलनासाठी निवड आहे.  या संचालनात निवड होण्यासाठी त्याने सहा महिन्याच्या कालावधीत १० दिवसांचे एक अशी १० शिबिरे पूर्ण केली. या शिबिरांमध्ये मेहनत, परिश्रम व ड्रिल यांचा नियमित सराव करून त्यांची दिल्ली येथे होणाऱ्या संचलनासाठी निवड झाली आहे.

महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्र गेले सलग चार वर्षे प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर (राजपथ) संचलनात सहभागी होत आहेत. ही महाविद्यालयासाठी गौरवाची बाब आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी दिली.

 या कामगिरीबद्दल  सीनियर अंडर ऑफिसर (एस.यु.ओ.) वैभव घोगरे यांचे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव (प्रशासन) ए. एम. जाधव, उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, डॉ. शुभांगी औटी, प्रा. अनिल जगताप, प्रा. गजाला सय्यद, राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी कॅप्टन डॉ. धिरज देशमुख, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.


 Give Feedback



 जाहिराती