सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: पुण्यात आंदेकर गँगच्या उमेदवाराचा विजय, रवींद्र धंगेकरांच्या पत्नीलाच पाडलं
  • प्रभाग क्रमांक 10 मधुन भाजपाचे चार ही उमेदवार विजयी
  • प्रभाग क्रमांक १८ ड मधून अटीतटीच्या लढतीत काँग्रेसचे प्रशांत जगताप विजयी
  • कोल्हापूर प्रभाग क्रमांक 9 मध्ये महायुती सर्व जागांवर विजयी
  • दक्षिण मुंबईत भाजपनं खातं उघडलं! वॉर्ड २१४, २१५ मधून भाजपचा विजय
  • पुणे निवडणूक आयोगाची अधिकृत आकडेवारी ;भाजप 47 ठिकाणी तर राष्ट्रवादी 6 काँग्रेस 3 ठिकाणी आघाडीवर
  • पुणे निवडणूक आयोगाची अधिकृत आकडेवारी; भाजप 27 ठिकाणी तर राष्ट्रवादी 4 ठिकाणी आघाडीवर
  • प्रभाग क्रमांक २५ मध्ये दुसऱ्या फेरीत ही भाजपा उमेदवारांची आघाडी कायम
 DIGITAL PUNE NEWS

अण्णासाहेब मगर महाविद्यालयात शुद्धलेखन कार्यशाळा आणि सुंदर हस्ताक्षर स्पर्धा

डिजिटल पुणे    16-01-2026 16:12:34

पुणे : पुणे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त दि. १६ जानेवारी २०२६ रोजी अण्णासाहेब मगर महाविद्यालयातील मराठी विभागाच्यावतीने ‘शुद्धलेखन कार्यशाळा’ आणि *‘सुंदर हस्ताक्षर स्पर्धे’*चे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या लेखन कौशल्याला चालना देणे आणि मराठी भाषेचे शुद्धलेखन नियम प्रभावीपणे समजावून देणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.

दि.१६ जानेवारी २०२६ रोजी, अण्णासाहेब मगर महविद्यालयातील मराठी विभागाच्यावतीने  मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ‘शुद्धलेखन कार्यशाळा’ आणि ‘सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे’ आयोजन  करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या लेखन कलेला प्रोत्साहन देण्यासाठी‘शुद्धलेखन कार्यशाळा’ आणि 'सुंदर हस्ताक्षर स्पर्धा' आयोजित करण्यात आली होती. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे यांनी  आजच्या डिजिटल युगात मराठी भाषेचे स्वरूप बदलत असताना, नवीन पिढीला भाषेचे व्याकरण आणि शुद्धलेखनाचे नियम समजावेत तसेच “सुंदर हस्ताक्षर हा माणसाचा दागिना आहे” या उक्तीनुसार विद्यार्थ्यांमध्ये सुवाच्य आणि वळणदार लेखनाची आवड निर्माण व्हावी ” असे मत व्यक्त केले.

सकाळी १०:०० वाजता महाविद्यालयाच्या मराठी विभागात या कार्यशाळेला सुरुवात झाली. ही कार्यशाळा पदवी आणि पदव्युत्तर विभागातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली होती. या कार्यशाळेमध्ये एकूण ५० विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. यामध्ये मराठी भाषा लेखन नियम, अशुद्ध उतारा शुद्ध करून लिहिणे , मराठी भाषेतील ऱ्हस्व-दीर्घ, अनुस्वार आणि विरामचिन्हांचा वापर, या घटकांवर प्रा. डॉ. नाना झगडे, डॉ. वंदना सोनवले, प्रा. सुरज काळे व प्रा. सुनील भोपे  यांनी मार्गदर्शन केले.

कार्यशाळेच्या शेवटी ‘सुंदर हस्ताक्षर स्पर्धा’ घेण्यात आली. विद्यार्थ्यांना पुरवण्यात आलेल्या कागदावर त्यांनी पेनने दिलेल्या उताऱ्याचे लेखन केले. अक्षरांचे वळण, शब्दांमधील अंतर, शुद्धलेखन आणि नीटनेटकेपणा या निकषांवर परीक्षकांनी मूल्यमापन केले.

कार्यशाळेचे आणि स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी विभागाने केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. नाना झगडे यांनी केले.  सूत्रसंचालन डॉ. वंदना सोनवले यांनी केले तर आभार प्रा. सुरज काळे यांनी मानले.


 Give Feedback



 जाहिराती