उरण : उलवे शहरात होणाऱ्या १ जिल्हा परिषद व २ पंचायत समिती सदस्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, वहाळ पंचायत समिती सदस्य पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे उलवे शहराध्यक्ष संतोष काटे यांनी निवडणूक लढवावी, अशी जोरदार मागणी जनतेतून होत आहे.उलवेतील डॅशिंग,आक्रमक आणि रस्त्यावर उतरून प्रश्न सोडवणारे नेतृत्व म्हणून संतोष काटे यांची ओळख आहे.कोणताही राजकीय वारसा नसताना, सर्वसामान्य गरीब घरातून पुढे येत त्यांनी उलवे शहरात विकासकामांच्या जोरावर जनतेच्या मनावर आपले नाव कोरले आहे.
पाणी, रस्ते, वीज, ड्रेनेज, वाहतूक, हॉस्पिटल, शिक्षण, महिला सुरक्षा, दिव्यांगांसाठी मदत, ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत शस्त्रक्रिया, रेल्वे सुविधा, सिडको पाठपुरावा, पोलिस स्टेशन, भूमिपुत्रांचे हक्क, रोजगार, आंदोलने—उलवेतील प्रत्येक प्रश्नात संतोष काटे अग्रभागी राहिले आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक असलेले संतोष काटे हे भ्रष्टाचारमुक्त, स्वच्छ चारित्र्याचे, विश्वासू आणि जनतेसाठी २४ तास उपलब्ध असणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात.काम बोलतं, नाव नाही ! म्हणूनच वहाळ पंचायत समितीसाठी संतोष काटे हाच योग्य आणि विजयाचा चेहरा असल्याचा ठाम विश्वास उलवेकर व्यक्त करत आहेत.