पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहर जंगम संस्था आयोजीत कोंटुबीक स्न्हेहमेळावा,हळदीकुंकू,सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला . कार्यक्रमाची सुरूवात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जंगम समाजाचे पहिले आमदार प्रविण स्वामी ,मा.सौ.सुनंदा श्रीशैल्य स्वामी ,नवनिर्वाचीत नगरसेविका अक्कलकोट, माजी नगराध्यक्षा स्वामी ,वीरभद्र देवस्थान ट्रस्ट ,शहाडोगंर चे अध्यक्ष ,नाशिक चे उद्योजक व जंगम समाजाचे सर्वेसर्वा नंदकिशोर जंगम ,तसेच पिंपरी चिंचवड शहर जंगम संस्थेचे अध्यक्ष विजय जंगम ,व संजय मानूरकर यांचे हस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली .या वेळी पौरोहित्य वैभव स्वामी ,विकास स्वामी आणि ओंकार स्वामी यांनी शंखनाद केला .प्रस्तावना संस्थेचे अध्यक्ष विजय जंगम यांनी केले,


व्यासपीठावर उपस्थित आमदार प्रवीण स्वामी ,नंदकिशोर जंगम ,पिंपरी चिंचवड शहर जंगम संस्थेचे अध्यक्ष विजय स्वामी तसेच वीरमाहेश्वर जंगम संस्थेचे अध्यक्ष महेश कुगांवकर ,पिंपरी चिंचवड शहर संस्थेचे मार्गदर्शक राजेश चिट्टे,गुरुराज चिरंतीमठ ,संजय मानूरकर ,श्री प्रशांत भानसे,विश्वनाथ स्वामी तसेच अक्कलकोटच्या नवनिर्वाचित नगरसेविका सुनंदा स्वामी ,माजी नगराध्यक्षा श्रीमती स्वामी ,पिंपरी चिंचवड शहर महिला अध्यक्ष संध्या स्वामी, रेणूका भस्मारे , यांचे सत्कार करण्यात आले .

आपले मनोगत व्यक्त करताना आमदार प्रवीण स्वामी यांनी जंगम रत्न पुरस्कार सन्मानित नंदकिशोर स्वामी यांचे अभिनंदन केले व जंगम समाजाचा एकीचे महत्त्व सांगितले व आपलाजीवन शिक्षक ते आमदार ही कारकीर्द कशी सुरुवात झाली हा जीवन प्रवास सांगितला नंदकिशोर जंगम यांनी जंगम समाजासाठीचे केलेले कार्य व उद्योग क्षेत्रातील भरीव कार्य याविषयी माहिती सर्व समाज बांधवांना सांगितले .

वीरमाहेश्वर जंगम संस्था ,पुणेचे अध्यक्ष महेश कुगांवकर ,रूद्रय्या स्वामी,अक्कलकोट,गुरुराज चंरतीमठ, संजय मानूरकर यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना पिंपरी चिंचवड शहर जंगम संस्थेला शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी जंगम समाजातील बाल कलाकारांनी ,महिलांनी उत्कृष्ट असे नृत्य ,ओंकार गणाचार्य यांचा पपेट शो चे सुंदर सादरीकरण करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. राजेश चिट्टे यांचेकडून वडिलांचे स्मृती प्रित्तर्थ गुणवंत व गरजवंत विद्यार्थ्यांना अर्थ सहाय्य करण्यात आले .याप्रसंगी पराग जवळेकर ,प्रमोद जंगम ,जुन्नर ,रूद्रय्या स्वामी ,अक्कलकोट इं मान्यवर उपस्थित होते .

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनोद लोणकर ,अनिकेत जंगम,जनार्दन जंगम,प्रविण जोतकर,संदिप घोणसे,विजय जंगम,बसय्या हत्तूरमठ,शिवप्रसाद जंगम,विलास जंगम,बाळासाहेब संगमे,प्रशांत जंगम,संध्या स्वामी,वर्षा बागले,छाया जंगम,आरती चिट्टे,सुमंगला मुथ्थलगिरी,रंजना संगमे,महादेवी जंगम,मंजुश्री स्वामी,राणी स्वामी ,तेजश्री जंगम,सुनिता कसबेकर,मधूमती जंगम ,युवा आघाडी ,जेष्ठ नागरिक यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते .कार्यक्रमाचे सुदंर सूत्रसंचलन जगदिश स्वामी व जयश्री जंगम यांनी केले.

