सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: पुण्यात आंदेकर गँगच्या उमेदवाराचा विजय, रवींद्र धंगेकरांच्या पत्नीलाच पाडलं
  • प्रभाग क्रमांक 10 मधुन भाजपाचे चार ही उमेदवार विजयी
  • प्रभाग क्रमांक १८ ड मधून अटीतटीच्या लढतीत काँग्रेसचे प्रशांत जगताप विजयी
  • कोल्हापूर प्रभाग क्रमांक 9 मध्ये महायुती सर्व जागांवर विजयी
  • दक्षिण मुंबईत भाजपनं खातं उघडलं! वॉर्ड २१४, २१५ मधून भाजपचा विजय
  • पुणे निवडणूक आयोगाची अधिकृत आकडेवारी ;भाजप 47 ठिकाणी तर राष्ट्रवादी 6 काँग्रेस 3 ठिकाणी आघाडीवर
  • पुणे निवडणूक आयोगाची अधिकृत आकडेवारी; भाजप 27 ठिकाणी तर राष्ट्रवादी 4 ठिकाणी आघाडीवर
  • प्रभाग क्रमांक २५ मध्ये दुसऱ्या फेरीत ही भाजपा उमेदवारांची आघाडी कायम
 शहर

संगमवाडी रस्त्यावर थरार; युवक कारच्या बोनेटवर, चालकाने दोन किमीपर्यंत फरफटत नेले

डिजिटल पुणे    19-01-2026 15:46:58

पुणे : शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास संगमवाडी रस्त्यावर थरारक प्रकार घडला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, एक कार महिला चालवत होती. यावेळी तिचा एका इनोव्हा चालकासोबत वाद झाला. कल्याणीनगरकडून येणाऱ्या चौकात इनोव्हा चालकाने आपली गाडी आडवी लावून महिलेच्या कारला अडवण्याचा प्रयत्न केला.वाद वाढल्यानंतर इनोव्हा चालक कारच्या समोर उभा राहिला. मात्र, महिलेने कार न थांबवता पुढे नेली. त्यामुळे इनोव्हा चालक थेट कारच्या बोनेटवर अडकला. अशा अवस्थेत महिलेने सुमारे दोन किलोमीटर अंतरापर्यंत कार चालवत नेल्याची माहिती आहे.

संगमवाडी रस्त्यावर शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास अंगावर काटा आणणारा प्रकार घडला. भरदिवसा घडलेल्या या घटनेने रस्त्यावर एकच खळबळ उडाली. एका महिलेने युवक बोनेटवर अडकलेला असताना  दोन किमीपर्यंत फरफटत नेल्याचा प्रकार समोर आलाय. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालाय. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, एका महिला चालकाची कार आणि एका इनोव्हा चालक यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद काही क्षणांतच गंभीर वळणावर गेला आणि अखेर युवकाला जीव धोक्यात घालणारा प्रसंग ओढवला.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणीनगरकडून संगमवाडीच्या दिशेने येताना चौकाजवळ दोन्ही वाहनांमध्ये वाद झाला. या वादादरम्यान इनोव्हा चालकाने आपली गाडी रस्त्यात आडवी लावून महिलेच्या कारला अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. दोन्ही चालकांमध्ये शाब्दिक वाद वाढला. संतप्त झालेल्या इनोव्हा चालकाने महिलेच्या कारसमोर उभे राहून तिला पुढे जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

यानंतर अचानक ब्रेक लावल्याने तो युवक रस्त्यावर पडला आणि गंभीर जखमी झाला. घटनेच्या वेळी VIP बंदोबस्तासाठी परिसरात तैनात असलेल्या पोलिसांनी तात्काळ जखमी युवकाला रुग्णालयात दाखल केले. घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


 Give Feedback



 जाहिराती