सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: पुण्यात आंदेकर गँगच्या उमेदवाराचा विजय, रवींद्र धंगेकरांच्या पत्नीलाच पाडलं
  • प्रभाग क्रमांक 10 मधुन भाजपाचे चार ही उमेदवार विजयी
  • प्रभाग क्रमांक १८ ड मधून अटीतटीच्या लढतीत काँग्रेसचे प्रशांत जगताप विजयी
  • कोल्हापूर प्रभाग क्रमांक 9 मध्ये महायुती सर्व जागांवर विजयी
  • दक्षिण मुंबईत भाजपनं खातं उघडलं! वॉर्ड २१४, २१५ मधून भाजपचा विजय
  • पुणे निवडणूक आयोगाची अधिकृत आकडेवारी ;भाजप 47 ठिकाणी तर राष्ट्रवादी 6 काँग्रेस 3 ठिकाणी आघाडीवर
  • पुणे निवडणूक आयोगाची अधिकृत आकडेवारी; भाजप 27 ठिकाणी तर राष्ट्रवादी 4 ठिकाणी आघाडीवर
  • प्रभाग क्रमांक २५ मध्ये दुसऱ्या फेरीत ही भाजपा उमेदवारांची आघाडी कायम
 जिल्हा

शिव प्रतिष्ठान व शिव मावळे करंजाडे यांच्या वतीने किल्ले शिवनेरी वरती स्वच्छता अभियान

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी)    19-01-2026 18:01:23

उरण : शिव प्रतिष्ठान व शिव मावळे करंजाडे यांच्या वतीने माझा किल्ला माझी जबाबदारी ही संकल्पना किल्ले शिवनेरी वरती मोठ्या उत्साहात पार पडली.शिव प्रतिष्ठान च्या वतीने सर्व शिव भक्तांना शिव प्रतिष्ठान चे अध्यक्ष सत्यजित पाटील ह्यांच्या वतीने असे आवाहन करण्यात आले की किल्ले हे बघण्यासाठी येऊ नका किंवा किल्ल्यांवरती एक पर्यटन स्थळ म्हणून न पाहता तेथे येणाऱ्या सर्व शिव भक्तांनी आपले गड किल्ले कसे स्वच्छ राहतील ह्या कडे लक्ष दिले पाहिजे असे आवाहन केले. शिव प्रतिष्ठान व शिव मावळ्यांनी जे स्वच्छता अभियान राबविला आहे ह्या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.अश्या प्रकारचे अभियान सर्व संस्थानी राबविले पाहिजे तरच गडकिल्ले स्वच्छ होतील असा विचार विविध सामाजिक संस्था संघटनानी व्यक्त केला आहे.या स्वच्छता मोहिमेत शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष सत्यजित पाटील,सुनील अंबावडे ,अविनाश ठोसर ,प्रशांत शेट्टी ,सुरेश बारवे , संदीप पाटील ,राकेश कुसले ,अमर कुसले ,दिनेश तेमगिरे ,शंतनू कदम ,रोहन शिर्के , योगेश कुलुल ,सिद्धांत अंबावडे ,दीपक चौधरी ,अक्षय मोरे ,ओमकार ,अथर्व आदी मान्यवरांनी भाग घेऊन ही स्वच्छता मोहीम पार पडली .


 Give Feedback



 जाहिराती