सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अंतराळात विक्रम रचणाऱ्या सुनिता विल्यम्स यांची नासातून एक्झिट ;तीन मोहिमा, 9 स्पेसवॉक, 608 दिवस; सुनिता विल्यम्स यांची ऐतिहासिक निवृत्ती
  • तीन मोहिमेतून तब्बल 608 दिवस अंतराळात घालवलेल्या सुनिता विल्यम्स यांची 'नासा'तून निवृत्ती; अंतराळ रणरागिनीची सोन्याची पावलं आता जमिनीवर 'विसावणार'
  • शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीला तारीख पे तारीख सुरुच! आता थेट बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी 23 जानेवारीला सुनावणी होणार!
  • ठाकरेंच्या शिवसेनेकडून गटनेतेपदी किशोरी पेडणेकरांची निवड; उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय
 DIGITAL PUNE NEWS

प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळांमध्ये देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

डिजिटल पुणे    23-01-2026 14:10:49

मुंबई : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त येत्या २६ जानेवारी रोजी राज्यातील सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये एकाचवेळी ‘देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘राष्ट्र प्रथम’ या संकल्पनेवर आधारित असणाऱ्या या कवायती शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमानंतर होणार असून यामध्ये राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांमधून, सात लाखापेक्षा जास्त शिक्षकांच्या उपस्थितीत सुमारे दोन कोटींपेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती, स्वयंशिस्त, आरोग्य जागृती, शारीरिकदृष्ट्या कसरत/ व्यायाम करण्यासाठी प्रेरित करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.याबाबत मंत्री भुसे यांनी मंत्रालयात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यावेळी उपस्थित होते.

मंत्री भुसे म्हणाले, या कवायतींचा कालावधी साधारतः १५ ते २० मिनिटांचा असेल. यासाठी सर्व शाळांना नमुना मार्गदर्शक व्हिडीओ पुरविण्यात आलेला असून सध्या प्रत्येक शनिवारी विद्यार्थ्यांचा सामूहिक स्वरुपात कवायत संचलन सराव करून घेण्यात येत आहे. प्रजासत्ताक दिनी सामूहिक कवायत संचलन असल्यामुळे गावातील, शहरातील मैदानाच्या क्षमतेनुसार विद्यार्थी शाळेत अथवा एका मैदानावर एकत्र करून कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. कार्यक्रमास परिसरातील लोकप्रतिनिधी, अधिकारी, ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी, पालक व समाजसेवी गणमान्य प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सरावासाठी प्रत्येक १० विद्यार्थ्यामागे एक शिक्षक मार्गदर्शनासाठी नेमण्यात आलेला आहे.

मंत्री भुसे म्हणाले, हा कार्यक्रम देशभक्तीमय वातावरणात होणार असून शालेय शिक्षण आयुक्त हे या कार्यक्रमाचे सर्व व्यवस्थापन पाहत आहे. आजारी, अशक्त, दिव्यांग अशा विद्यार्थ्यांना कवायत करण्याची सक्ती नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी आदींनी या कार्यक्रमासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.


 Give Feedback



 जाहिराती