सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अंतराळात विक्रम रचणाऱ्या सुनिता विल्यम्स यांची नासातून एक्झिट ;तीन मोहिमा, 9 स्पेसवॉक, 608 दिवस; सुनिता विल्यम्स यांची ऐतिहासिक निवृत्ती
  • तीन मोहिमेतून तब्बल 608 दिवस अंतराळात घालवलेल्या सुनिता विल्यम्स यांची 'नासा'तून निवृत्ती; अंतराळ रणरागिनीची सोन्याची पावलं आता जमिनीवर 'विसावणार'
  • शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीला तारीख पे तारीख सुरुच! आता थेट बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी 23 जानेवारीला सुनावणी होणार!
  • ठाकरेंच्या शिवसेनेकडून गटनेतेपदी किशोरी पेडणेकरांची निवड; उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय
 DIGITAL PUNE NEWS

वेदमूर्ती बसवराज शास्त्री यांचे निधन; सोलापूरच्या धार्मिक-सांस्कृतिक परंपरेत शोककळा

डिजिटल पुणे    23-01-2026 18:56:20

सोलापूर : सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यात्रेतील अक्षता सोहळ्याचे सुप्रसिद्ध निवेदक वेदमूर्ती बसवराज शास्त्री यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या निधनाने सोलापूरच्या धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.अक्षता सोहळ्यातील त्यांची अनोखी, ओघवती आणि भावस्पर्शी निवेदनशैली विशेष ओळख ठरली होती. त्यांच्या शब्दांमधून भक्तिभाव, परंपरा आणि श्रद्धेचा संगम अनुभवायला मिळत असे. त्यामुळे अक्षता सोहळा केवळ धार्मिक विधी न राहता भक्तिभावाचा उत्सव ठरत असे.‘व्याख्यान केसरी’ म्हणूनही परिचित असलेल्या शास्त्री यांनी आपल्या प्रभावी वाणीने अनेक वर्षे सोलापूरकरांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त होत असून, सोलापूरकरांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.


 Give Feedback



 जाहिराती