पुणे : नऱ्हेगाव येथील नागरिकांचा दीर्घकाळचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी स्थानिक पातळीवर सातत्याने पाठपुरावा करणारे माजी उपसरपंच सागर भूमकर यांच्या पुढाकाराने महत्त्वपूर्ण हालचालींना वेग आला आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे वडगाव प्रायझा सिटी ते आशीर्वाद हॉटेल दरम्यान १० इंची, ८ इंची व ६ इंची व्यासाची नवीन डी.आय. पाईपलाईन टाकण्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या कामाची आज प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
सध्या नानासाहेब खेडेकर कमान नगरपर्यंत पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले असून, पुढील टप्प्यात आशीर्वाद हॉटेल ते नवले आयटी पार्क तसेच साबळे–वघीरे कंपनी ते वीर बाजी पासलकर रोड या भागात काही अतिक्रमणांमुळे तांत्रिक अडचणी येत आहेत. मात्र, ही अतिक्रमणे दूर करून काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी सागर भूमकर यांच्यासह संबंधित यंत्रणांकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नऱ्हे परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत होणार असून, परिसर टँकरमुक्त करण्याच्या दिशेने हे मोठे पाऊल ठरणार आहे. तक्षशिला सोसायटी, नऱ्हे गावठाण, दरोडे जोग टाकी परिसर तसेच मानाजी नगर भागासाठी नवीन पाईपलाईनमुळे पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्याची आशा निर्माण झाली आहे.नऱ्हेकरांसाठी ही सकारात्मक व दिलासादायक बातमी असून, स्थानिक नेतृत्वाच्या प्रयत्नातून विकासकामे मार्गी लागत असल्याचे हे उत्तम उदाहरण मानले जात आहे