सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अंतराळात विक्रम रचणाऱ्या सुनिता विल्यम्स यांची नासातून एक्झिट ;तीन मोहिमा, 9 स्पेसवॉक, 608 दिवस; सुनिता विल्यम्स यांची ऐतिहासिक निवृत्ती
  • तीन मोहिमेतून तब्बल 608 दिवस अंतराळात घालवलेल्या सुनिता विल्यम्स यांची 'नासा'तून निवृत्ती; अंतराळ रणरागिनीची सोन्याची पावलं आता जमिनीवर 'विसावणार'
  • शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीला तारीख पे तारीख सुरुच! आता थेट बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी 23 जानेवारीला सुनावणी होणार!
  • ठाकरेंच्या शिवसेनेकडून गटनेतेपदी किशोरी पेडणेकरांची निवड; उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय
 शहर

ज्येष्ठ दांपत्याची जमीन फसवणुकीने बळकावण्याचा प्रयत्न; दोन जणांवर गुन्हा दाखल

डिजिटल पुणे    27-01-2026 11:30:55

पुणे : पुणे जिल्ह्यात सध्या जमिनीचे दर प्रचंड वाढले असून पीएमआरडीएच्या रिंग रोड प्रकल्पामुळे रिंग रोडलगतच्या जमिनींना सोन्याचे भाव आले आहेत. या पार्श्वभूमीवर जमिनीच्या व्यवहारांमध्ये फसवणुकीचे प्रकार वाढताना दिसत असून असाच एक गंभीर प्रकार हवेली तालुक्यातील मौजे बहुली येथे उघडकीस आला आहे.मौजे बहुली येथील ज्येष्ठ नागरिक श्री. विलास भगत आणि सौ. कमल विलास भगत यांच्या वडिलोपार्जित शेतजमिनीची फसवणूक करून बळकावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गावातीलच संतोष भगत व त्याचा साथीदार मयूर मारुती बदगुडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, भगत दांपत्याची गट क्रमांक ३२८ व ४५४ मधील शेतजमीन आहे. यापैकी केवळ गट क्रमांक ४५४ मधील १७ गुंठे जमिनीचा व्यवहार ठरलेला असताना आरोपींनी केवळ टोकन म्हणून दिलेले ५ लाख रुपये संपूर्ण व्यवहाराचा मोबदला असल्याचे खरेदीखत दस्तामध्ये नमूद केले. तसेच कोणतीही स्पष्ट माहिती न देता घाईगडबडीने दुय्यम निबंधक कार्यालयात नेऊन दोन्ही गटांतील जमिनींचा एकत्रित खरेदीखत दस्त नोंदविण्यात आला.विशेष म्हणजे, सदर खरेदीखतामध्ये सरकारी मूल्यांकन देखील केवळ एका जमिनीचेच दाखविण्यात आले, त्यामुळे आरोपींनी संगनमताने शेतकऱ्यांची तसेच शासनाचीही फसवणूक करून मुद्रांक शुल्क बुडवल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी पीडित श्री. विलास भगत यांनी ॲड. नागेश जेधे व ॲड. ओंकार चव्हाण यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. वकिलांमार्फत पोलिस उपायुक्तांकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आला. अर्जाची छाननी केल्यानंतर त्यामध्ये तथ्य आढळून आल्याने उत्तम नगर पोलीस स्टेशन येथे आरोपी संतोष भगत व मयूर बदगुडे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 316(5), 316(2), 318(4) आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेमुळे रिंग रोड परिसरातील जमिनीच्या व्यवहारांमध्ये होत असलेल्या गैरप्रकारांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, नागरिकांनी जमीन व्यवहार करताना अधिक सावध राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती