सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अंतराळात विक्रम रचणाऱ्या सुनिता विल्यम्स यांची नासातून एक्झिट ;तीन मोहिमा, 9 स्पेसवॉक, 608 दिवस; सुनिता विल्यम्स यांची ऐतिहासिक निवृत्ती
  • तीन मोहिमेतून तब्बल 608 दिवस अंतराळात घालवलेल्या सुनिता विल्यम्स यांची 'नासा'तून निवृत्ती; अंतराळ रणरागिनीची सोन्याची पावलं आता जमिनीवर 'विसावणार'
  • शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीला तारीख पे तारीख सुरुच! आता थेट बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी 23 जानेवारीला सुनावणी होणार!
  • ठाकरेंच्या शिवसेनेकडून गटनेतेपदी किशोरी पेडणेकरांची निवड; उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय
 शहर

वेदांता सोसायटी, वाकड येथे ७७ वा गणतंत्र दिन उत्साहात साजरा

अजिंक्य स्वामी    27-01-2026 13:12:40

पुणे - वाकड येथील वेदांता सोसायटीमध्ये भारताचा ७७ वा गणतंत्र दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सोसायटीतील लहानग्यांनी काढलेल्या भव्य रॅलीने झाली. तिरंगा हाती घेऊन देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

 

 

 

 

 

यानंतर पारंपरिक पद्धतीने ध्वजारोहण समारंभ पार पडला. ध्वजारोहणानंतर सोसायटीतील कलाप्रेमी मुलांनी देशभक्तीपर गीत, नृत्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन अस्मिता रुद्रवार आणि हेमांगी कुलकर्णी यांनी केले.

 

यावेळी वेदांता सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सोमनाथ धोंडे यांनी रहिवाशांना संबोधित करताना गणतंत्र दिनाचे ऐतिहासिक महत्त्व सांगितले तसेच समाजात एकोपा, सामूहिक भावना आणि नागरिकांची जबाबदारी यावर भर दिला.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रमोद भोसले, सुमंत देशपांडे, पराग रुद्रवार, मयूर वाघमारे, मदन पाटील, गौरव मानकर आणि निखिल मुळे यांनी विशेष परिश्रम घेतले.सामूहिक भावना, देशप्रेम आणि सामाजिक ऐक्य वृद्धिंगत करण्यासाठी वेदांता सोसायटीने राबवलेले हे आयोजन सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले.

 

 


 Give Feedback



 जाहिराती