सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अंतराळात विक्रम रचणाऱ्या सुनिता विल्यम्स यांची नासातून एक्झिट ;तीन मोहिमा, 9 स्पेसवॉक, 608 दिवस; सुनिता विल्यम्स यांची ऐतिहासिक निवृत्ती
  • तीन मोहिमेतून तब्बल 608 दिवस अंतराळात घालवलेल्या सुनिता विल्यम्स यांची 'नासा'तून निवृत्ती; अंतराळ रणरागिनीची सोन्याची पावलं आता जमिनीवर 'विसावणार'
  • शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीला तारीख पे तारीख सुरुच! आता थेट बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी 23 जानेवारीला सुनावणी होणार!
  • ठाकरेंच्या शिवसेनेकडून गटनेतेपदी किशोरी पेडणेकरांची निवड; उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय
 जिल्हा

जेएनपीए विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये पंचांग वर्ष 2025 दरम्यान 26.86% निर्यात-आयातमध्ये प्रमाणवाढ; आर्थिक व्यापारगतीचे प्रतिबिंब

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी)    27-01-2026 14:38:13

उरण : भारताचे पहिले बहुउत्पादन, बंदराधारित विशेष आर्थिक क्षेत्र (विआक्षे) असलेल्या जेएनपीए विआक्षे ने पंचांग वर्ष 2025 मध्ये कंटेनर हाताळणीत भक्कम कामगिरी नोंदवली असून, यामुळे वाढलेली व्यापारगतिविधी आणि निर्यात-आयात भागधारकांमधील वाढता विश्वास स्पष्टपणे दिसून येतो.


पंचांग वर्ष 2025 दरम्यान जेएनपीए विआक्षे ने एकूण 20,693 टीईयू इतका निर्यात-आयात कंटेनर व्यवहार हाताळला, जो पंचांग वर्ष 2024 मधील 16,312 टीईयूच्या तुलनेत असून, यामध्ये सुमारे 26.86% वर्ष-दर-वर्ष वाढ नोंदवली गेली आहे. एकूण कंटेनर हाताळणीत झालेली ही लक्षणीय वाढ औद्योगिक कार्यक्षमता, सुधारित लॉजिस्टिक्स कार्यक्षमता तसेच विआक्षेमधून होणाऱ्या मालवाहतुकीतील वाढ अधोरेखित करते.
कामगिरीवर प्रतिक्रिया देताना गौरव दयाल, भा. प्र. से., अध्यक्ष, जेएनपीए, म्हणाले, “पंचांग वर्ष 2025 दरम्यान जेएनपीए विआक्षे मध्ये एकूण निर्यात-आयात व्यवहारात झालेली मजबूत वाढ ही विआक्षेच्या पायाभूत सुविधा आणि सुलभीकरण क्षमतेवर व्यापार व उद्योग क्षेत्राने दाखवलेल्या वाढत्या विश्वासाचे प्रतीक आहे. जेएनपीए विआक्षे पारंपरिक टर्मिनल-केंद्रित भूमिकेपलीकडे जाऊन, एकात्मिक बंदर परिसंस्था म्हणून आपले स्थान अधिक दृढ करत आहे. हा सर्वसमावेशक आराखडा उद्योगांसाठी मूल्यनिर्मितीला चालना देण्यासाठी, पुरवठा साखळीतील प्रवाहीपणा वाढवण्यासाठी आणि संपूर्ण हितधारक समुदायासाठी दीर्घकालीन लाभ निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आला आहे.”


जेएनपीए विशेष आर्थिक क्षेत्र एकूण 277.38 हेक्टर क्षेत्रफळावर पसरलेले आहे. यापैकी 129.73 हेक्टर क्षेत्र आधीच भाडेपट्ट्यावर देण्यात आले असून, भविष्यातील भाडेपट्ट्यासाठी 34.16 हेक्टर क्षेत्र उपलब्ध आहे. सध्या या विआक्षेमध्ये 11 कार्यरत युनिट्स तसेच एक फ्री ट्रेड वेअरहाऊसिंग झोन (एफटीडब्ल्यूझेड) कार्यरत असून, यामुळे सातत्यपूर्ण औद्योगिक हालचाल आणि पुढील विकासासाठी मोठी संधी अधोरेखित होते.
निर्यात-आयात व्यवहारातील सातत्यपूर्ण वाढ जेएनपीए विआक्षे ची एक महत्त्वपूर्ण व्यापार व लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून असलेली भूमिका अधिक दृढ करते. रणनीतिक स्थान, बंदराशी अखंड जोडणी तसेच उद्योगस्नेही वातावरणाच्या बळावर जेएनपीए विआक्षे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी एक विश्वासार्ह केंद्र म्हणून पुढे येत आहे.


 Give Feedback



 जाहिराती