सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : मोठी बातमी : अजित पवारांच्या विमानाचा अपघात, 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, बारामतीमध्ये लॅंडींगदरम्यान घडली घटना
  • : अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू; महाराष्ट्र हादरला, बारामतीमध्ये नेमकं काय घडलं?
  • भीषण अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन; राजकारणातील 'दादा' पर्वाचा बारामतीत करुण अंत
 विश्लेषण

मोठी बातमी : अजित पवारांच्या विमानाचा अपघात, 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, बारामतीमध्ये लॅंडींगदरम्यान घडली घटना

डिजिटल पुणे    28-01-2026 11:55:41

बारामती (पुणे)  — बारामतीतून मोठी बातमी समोर आली आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाचा १५ मिनिटांपूर्वी अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. विमानाचा बारामतीमध्ये लॅंडिंगदरम्यान अपघात झाला आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. विमानात अजित पवार आणि त्यांचे सुरक्षारक्षक होते, असंही सांगितलं जात आहे. आज सकाळी बारामतीमध्ये अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला. आज बारामतीमध्ये सकाळी सुमारे **८:४५ वा. ते ९:१५ वा. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ राजकीय नेते अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. हे अपघात लँडिंगच्या दरम्यान बारामती विमानतळाजवळ घडले असून, या दुर्घटनेत पवारांसह विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला आहे

राज्य सरकार आणि नागरिकांसाठी ही घटना अत्यंत दुःखद आणि धक्कादायक आहे. घटनास्थळी विमानाचे अवशेष आतून आणि बाहेरून जळून कोळशाप्रमाणे दिसत असून, धुराचे लोट सर्वत्र पसरले आहेत. अग्निशमन दल, पोलीस आणि बचाव पथक त्वरित दाखल झाले होते.

या विमानातातून प्रवास करणाऱ्यांना बाहेर काढण्यात येत आहे, विमानातून प्रवास करणारे काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. लँडिंगच्या वेळेस हा अपघात झाल्याचे समजते. ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या ठिकाणी धुराचे लोट पसरले आहेत. यामध्ये जखमी झालेल्यांना रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात येत आहे, या विमानामध्ये अजित पवार प्रवास करत होते, याची पुष्टी करण्यात आली आहे, पवार कुटूंबाकडून अपघताची माहिती घेतली जात आहे, अपघाताच्या ठिकाणी पोलिस आणि अग्नीशामक दल दाखल झाले आहे, विमानाचा अपघात झाल्यानंतर विमानाने पेट घेतला अशी माहिती समोर आली आहे. 

घटनास्थळी प्राथमिक माहिती अशी आहे की, विमान बारामती येथे लँडिंग करत असताना अचानक नियंत्रण सुटले व ते रनवेच्या उजव्या बाजूला फिरून चोट बसली. या अपघातामुळे विमान लगेचच आगीत भस्म झाले आणि कोणत्याही प्रवाशाला वाचवता आला नाही. अजित पवार यांच्या बरोबर पाच अन्य लोकही विमानात होते आणि सर्वांचे मृत्यू झाले, असे अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले आहे. यात प्रमुख व्यक्तिमत्त्वे, सुरक्षा कर्मचारी आणि विमान कर्मचारी यांचा समावेश आहे. 

अजित पवार हे राष्ट्रीय आणि महाराष्ट्रातील एक प्रख्यात राजकीय नेते होते, त्यांचा दूरगामी अनुभव आणि नेतृत्व राज्य राजकारणासाठी महत्त्वाचा ठरला होता, त्यामुळे त्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. अनेक नेते आणि नागरिकांनी त्यांच्या आत्म्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे.

या अपघातामुळे आज बारामती आणि संपूर्ण महाराष्ट्रात दु:ख आणि हल्लाबोल चालू आहे, तसेच पुढील तपासासाठी DGCA आणि प्रशासनिक अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे. ही दु:खद घटना महाराष्ट्राच्या राजकीय, प्रशासनिक आणि सामाजिक क्षेत्रासाठी मोठा धक्का आहे आणि देशभरातून शोक संवेदना व्यक्त केल्या जात आहेत.


 Give Feedback



 जाहिराती