बारामती : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्यभरातून शोकसंदेश व्यक्त केले जात आहेत.अजित पवार आज बारामतीमध्ये तीन जाहीर सभांना उपस्थित राहणार होते.बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे.
बारामती येथील विमान अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्यासह त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव, फ्लाईट असिस्टंट पिंकी माळी, कॅप्टन सुमित कपूर आणिकॅप्टन शांभवी पाठक अपघातात मृत्यूमुखी पडले. महाराष्ट्र सामान्य प्रशासन विभाग (प्रोटोकॉल) नुसार, उद्या गुरुवारी (29 जानेवारी) सकाळी 11 वाजता पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. राज्यात तीन दिवस राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. बारामतीमध्ये लँडिंग होण्यापूर्वीच अजित पवार यांचे विमान कोसळले. अजित पवार आज (28 जानेवारी) बारामतीमध्ये तीन जाहीर सभांना उपस्थित राहणार होते.
आज कुठे ठेवले जाणार पार्थिव?
दरम्यान, अजित पवार यांचे पार्थिव बारामती वैद्यकीय महाविद्यालयात ठेवण्यात आले होते. तिथं अभूतपूर्व गर्दी झाली होती. त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास अजित पवार यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठानमध्ये आणण्यात आलं. याठिकाणी त्यांचे पार्थिव ठेवण्यात आलं असून आज रात्री 10 वाजेपर्यंत विद्या प्रतिष्ठानमध्ये अंत्यदर्शन घेता येईल. उद्या सकाळी 6 ते 9 त्यांच्या मुळगावी काटेवाडी इथं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी अकरा वाजता विद्या प्रतिष्ठानमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. अजित पवार यांचे पार्थिव सुरुवातीला बारामती वैद्यकीय महाविद्यालयात ठेवण्यात आले होते. त्यानंतर दुपारी सुमारे 3 वाजता पार्थिव विद्या प्रतिष्ठान येथे आणण्यात आले आहे.आज रात्री 10 वाजेपर्यंत विद्या प्रतिष्ठानमध्ये नागरिकांना अंत्यदर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे.
उद्या सकाळी काटेवाडीत अंत्यदर्शन
उद्या, 29 जानेवारी रोजी सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत अजित पवार यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी काटेवाडी येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.त्यानंतर सकाळी 11 वाजता विद्या प्रतिष्ठान मैदानात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर
राज्य सरकारकडून तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. अंत्यसंस्कार शासकीय इतमामात, गार्ड ऑफ ऑनरसह पार पडणार आहेत.
बारामती विमान अपघातात नेमकं काय घडलं?
दिल्लीस्थित व्हीएसआर व्हेंचर्सचे लिअरजेट 45 विमान सकाळी 8:10 वाजता मुंबईहून उड्डाण झाले
सकाळी 8:45 वाजता विमानाचा रडार संपर्क तुटला
8:50 वाजता बारामतीजवळ विमान कोसळले
विमानात एकूण पाच जण होते
अपघातात मृत्यूमुखी पडलेले
उपमुख्यमंत्री अजित पवार
अंगरक्षक विदीप जाधव
फ्लाइट असिस्टंट पिंकी माळी
पायलट कॅप्टन सुमित कपूर
सह-पायलट कॅप्टन शांभवी पाठक
अजित पवार यांची ओळख त्यांच्या घड्याळावरून पटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.