सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : मोठी बातमी : अजित पवारांच्या विमानाचा अपघात, 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, बारामतीमध्ये लॅंडींगदरम्यान घडली घटना
  • : अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू; महाराष्ट्र हादरला, बारामतीमध्ये नेमकं काय घडलं?
  • भीषण अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन; राजकारणातील 'दादा' पर्वाचा बारामतीत करुण अंत
 जिल्हा

अमित महादेव जंगम यांची शिवसेना रायगड जिल्हा प्रवक्ता व कामगार सेना उपाध्यक्षपदी नियुक्ती

डिजिटल पुणे    28-01-2026 18:43:56

रायगड :  सप्रेम जय महाराष्ट्र!वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार, संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षाच्या रायगड जिल्हा प्रवक्ता तसेच महाराष्ट्र राज्य कामगार सेना उपाध्यक्ष पदी श्री. अमित महादेव जंगम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ही नियुक्ती शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख श्री. विनोदभाऊ साबळे व महाराष्ट्र राज्य कामगार सेना अध्यक्ष श्री. जेरीभाई यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी त्यांनी श्री. जंगम यांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या शिकवणुकीनुसार संघटना अधिक मजबूत करण्यासाठी श्री. अमित जंगम हे सक्रिय भूमिका बजावतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.नियुक्तीपत्र स्वीकारताना श्री. अमित जंगम यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानून, शिवसेनेच्या विचारधारेनुसार निष्ठेने काम करण्याची ग्वाही दिली.


 Give Feedback



 जाहिराती