सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अनेकांची स्वप्नं पूर्ण केली, पण अजितदादांची दोन स्वप्नं अपूर्णच राहिली; वेळेआधीच एक्झिटने महाराष्ट्र सुन्न
  • ज्या मातीतून रोपटं उगवलं त्याच मातीत विलीन होणार! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आज बारामतीत अंत्यसंस्कार, शोकाकुल वातावरण
  • अवघ्या महाराष्ट्राच्या अश्रुंचा बांध फुटला, बारामती पोरकी झाली; अजित पवार पंचत्वात विलीन
  • अजितदादांचा झंझावात बारामतीच्या मातीत कायमचा विसावला; 'कामाचा माणूस' अनंतात विलीन, अवघा सह्याद्री हळहळला
  • : मोठी बातमी : अजित पवारांच्या विमानाचा अपघात, 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, बारामतीमध्ये लॅंडींगदरम्यान घडली घटना
 विश्लेषण

“पाया पडतो तुमच्या आमच्या दादांना नका नेऊ ना” – अजित पवारांचं पार्थिव उचलताच कार्यकर्त्यांच्या भावनांचा बांध फुटला

डिजिटल पुणे    29-01-2026 11:28:58

बारामती – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी बारामती येथे विमान अपघातात दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवाचे गुरुवारी अंत्यसंस्कार विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात करण्यात आले.अजित पवार यांचे पार्थिव गुरुवारी सकाळी बारामती वैद्यकीय महाविद्यालयातून काटेवाडी येथील निवासस्थानी आणण्यात आले होते. याठिकाणी अजित पवार यांचे पार्थिव काहीवेळासाठी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. अजित पवार यांनी याच काटेवाडी येथील घरात आपला बहुतांश काळ घालवला आहे. ते सणावाराच्या दिवशी याठिकाणी येऊन आपल्या आप्तेष्टांसोबत सण साजरे करायचे. यामुळे अजित पवार आणि काटेवाडी येथील ग्रामस्थांची नाळ एकमेकांशी जुळली होती. त्यामुळे अजित पवार यांचे अंत्यदर्शन घ्यायला आज काटेवाडीच्या ग्रामस्थांनी निवासस्थानाबाहेर प्रचंड गर्दी केली होती.

अजित पवार यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठान येथे अंत्यदर्शनासाठी रुग्णवाहिकेतून नेण्यात आले. अजित पवार यांचे पार्थिव काटेवाडीतून रुग्णवाहिकेत चढवले तेव्हा येते उपस्थित असलेल्या ग्रामस्थांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा बांध फुटला. हे सर्वजण अक्षरश: ओक्सोबोक्शी रडत होते. 'ओ थांबा ना... आमच्या दादांना नका नेऊ ना... पाया पडतो तुमच्या', अशी विनंती हे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ करत होते. काटेवाडीतील महिलाही अजितदादांना शेवटचा निरोप देताना प्रचंड रडत होत्या. आमचा दादा महाराष्ट्राचा वाघ होता. आम्ही बहिणी अजितदादाला सलाम करतो, असे बोलताना या महिला रडत होत्या. 

अजित पवार यांचे पार्थिव सकाळी बारामती वैद्यकीय महाविद्यालयातून काटेवाडी येथील निवासस्थानावर आणण्यात आले. येथे ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांनी शेवटचे दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी केली. पार्थिव रुग्णवाहिकेतून नेताना उपस्थित लोक भावूक झाले, अनेक जण अक्षरशः रडत होते. कार्यकर्त्यांनी “पाया पडतो तुमच्या आमच्या दादांना नका नेऊ ना” अशी भावनिक विनंती केली. काटेवाडीतील महिलांनीही अजित पवार यांना अंतिम निरोप देताना प्रचंड रडले, “आमचा दादा महाराष्ट्राचा वाघ होता, आम्ही बहिणी अजितदादाला सलाम करतो” असे सांगून श्रद्धांजली वाहिली.

पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. येथे हजारो लोकांची गर्दी झाली असून अनेक बडे राजकीय नेते देखील दाखल झाले. अजित पवार यांचे पार्थिव सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मुखाग्नी देण्यात आले.अजित पवार यांच्या निधनाने बारामती आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या अचानक निधनाने राज्यभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अजित पवार यांच्या निधनाने राज्यभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हा नियतीने महाराष्ट्रावर केलेला मोठा आघात असल्याची भावना जनमानसातून व्यक्त होताना दिसत आहे.


 Give Feedback



 जाहिराती