सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अनेकांची स्वप्नं पूर्ण केली, पण अजितदादांची दोन स्वप्नं अपूर्णच राहिली; वेळेआधीच एक्झिटने महाराष्ट्र सुन्न
  • ज्या मातीतून रोपटं उगवलं त्याच मातीत विलीन होणार! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आज बारामतीत अंत्यसंस्कार, शोकाकुल वातावरण
  • अवघ्या महाराष्ट्राच्या अश्रुंचा बांध फुटला, बारामती पोरकी झाली; अजित पवार पंचत्वात विलीन
  • अजितदादांचा झंझावात बारामतीच्या मातीत कायमचा विसावला; 'कामाचा माणूस' अनंतात विलीन, अवघा सह्याद्री हळहळला
  • : मोठी बातमी : अजित पवारांच्या विमानाचा अपघात, 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, बारामतीमध्ये लॅंडींगदरम्यान घडली घटना
 विश्लेषण

अजित पवार यांना बारामतीत अखेरचा निरोप; अजितदादांचा झंझावात बारामतीच्या मातीत कायमचा विसावला; 'कामाचा माणूस' अनंतात विलीन ,राज्यभर शोककळा

डिजिटल पुणे    29-01-2026 12:21:22

बारामती: साडेचार दशकांच्या राजकीय कारकिर्दीत ग्रामीण महाराष्ट्राशी प्रगाढ नाळ जुळवणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर आज (29 जानेवारी) बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये अत्यंत शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात अंतिम निरोप देण्यात आला.

असंख्य भावभावनांच्या हिंदोळ्यांवर बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अत्यंत शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात निरोप देण्यात आला.राज्याच्या राजकारणात गेल्या साडे चार दशकांपासून झंझावात निर्माण केलेल्या..आपल्या रोखठोक शैलीने अनेकांना चकित करून सोडलेल्या.. कामाचा माणूस म्हणून अखेरच्या श्वासापर्यंत ठेवलेली प्रतिमा.. ग्रामीण महाराष्ट्राशी नाळ जोडलेली नाळ...स्वत:साठी राजकीय विद्यापीठ करून घेतानाच दिलेला शब्द मोडायचा नाही, आपण कामाचा माणूस आहे हे तहहयात जपताना केलेला संघर्ष या आणि असंख्य भावभावनांच्या हिंदोळ्यांवर बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये आज (29 जानेवारी) राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अत्यंत शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात निरोप देण्यात आला.

अजित पवार यांचे पार्थिव त्यांच्या मुलांनी चिरंजीव पार्थ आणि जय पवार यांनी मंत्राग्नि दिले. समर्थक, कार्यकर्ते व नागरिकांनी "अजित दादा अमर राहो" अशा घोषांमध्ये त्यांच्या योगदानाची आणि प्रेमाची साक्ष दिली. महिलांसह कार्यकर्त्यांनी केलेला आक्रोशही भावनिक दृष्य निर्माण करत होता.

पार्थिवाचे अंतिम दर्शन कुटुंबीयांनी घेतले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांसह अनेक नेते उपस्थित होते.

अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी देशभरातील राजकीय नेते बारामतीत दाखल झाले. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, तसेच अनेक मंत्री आणि खासदार सहभागी झाले.

शहरभर शोककळा पसरली असून, त्यांच्या कार्यकाळातील सेवाभाव, जनसंपर्क आणि ग्रामीण भागासाठी केलेल्या योगदानाला नागरिकांनी मान दिला. अजित पवार हे खऱ्या अर्थाने "कामाचे आणि जनतेचे माणूस" म्हणून कायम स्मरणात राहणार आहेत.


 Give Feedback



 जाहिराती